घरताज्या घडामोडीमाथेरान : महावितरणच्या बिल वसुली विरोधात मनसेचा एल्गार

माथेरान : महावितरणच्या बिल वसुली विरोधात मनसेचा एल्गार

Subscribe

महावितरणकडून अवाच्या सवा बिल आकारून वसुली

महावितरणने येथे सुरू केलेल्या वीज बिल वसुली विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक पवित्रा घेत आंदोलनाचा इशारा दिला आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या होणार्‍या मुस्कटदाबीला वाचा फोडण्यासाठी शहराध्यक्ष संतोष कदम यांनी महावितरणच्या कर्जत येथील कार्यालयाला धडक देत उपरोक्त इशारा दिला.कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाकडून पर्यटन स्थळांवर कडक निर्बंधांसह लॉकडाऊन घोषित करण्यात आला होता. याची झळ १०० टक्के पर्यटनावर अवलंबून असलेल्या या शहराला देखील बसली. अलिकडे काही शर्थी-अटींवर शहर अनलॉक करण्यात आले आहे. मात्र लॉकडाऊन काळातून नागरिक सावरत नाही तोच थकित बिले वसुलीकरिता महावितरण आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने ग्राहकांच्यापाठी जवळपास ७ ते ८ महिन्यांची बिले एकरकमी भरा, असा तगादा लावला असून, प्रसंगी अरेरावी देखील केली जात आहे.

माथेरानकरांचे जीवनमान पर्यटनावर अवलंबून असून, कोरोना काळात पर्यटन व्यवसाय रोडावल्यामुळे अनेकांची आर्थिक कोंडी झाली आहे. अशातच महावितरणकडून अवाच्या सवा बिल आकारून वसुलीकरिता कोणत्याही प्रकारची मुभा दिली जात नसल्याने ग्राहक आणि वसुली अधिकार्‍यांमध्ये खटके उडण्याच्या घटना समोर येत आहेत. यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. यासाठी मनसेच्यावतीने २४ ऑगस्ट रोजी कर्जत कार्यालयाचे उप कार्यकारी अभियंते प्रकाश देवके यांना निवेदन देण्यात आले.

- Advertisement -

महावितरण कार्यालयात ग्राहकांना वाढीव बिल आकारणी, तसेच काही तक्रारी असल्यास समाधानकारक उत्तरे न मिळणे, लॉकडाऊन काळातील वीज बिल भरण्याबाबत सतत तगादा लावून ग्राहकांना मानसिक त्रास देणे आदी प्रकार थांबवावे, यासह थकित बिलांसाठी विशेष बाब म्हणून येथील ग्राहकांना ३ टप्प्यात बिल भरून द्यावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. असे न झाल्यास पुढील १० दिवसांत माथेरान कार्यालयाबाहेर मनसेच्यावतीने ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. यावेळी कदम यांच्यासह माजी अध्यक्ष संतोष केळगणे, उपाध्यक्ष असिफ खान, सचिव रवींद्र कदम उपस्थित होते.


हे ही वाचा – मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आज राज्यपालांना भेटणार, १२ आमदारांच्या यादीवर चर्चा?

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -