घरठाणेआरटीईवर धनदांडग्याचा डल्ला; शिक्षण विभागाकडून चौकशी सुरु

आरटीईवर धनदांडग्याचा डल्ला; शिक्षण विभागाकडून चौकशी सुरु

Subscribe

कल्याणतील एका खाजगी शाळेत तब्बल २२ धनदांडग्या कुटुंबातील मुलांचे प्रवेश झाल्याचे माहितीच्या अधिकारातून उघड झाले आहे.

गरीब गरजू विद्यार्थ्याना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शासनाच्या आरटीइ म्हणजेच शिक्षण हक्क कायद्या अंतर्गत गरीब गरजू मुलांचे प्रवेश होणे अपेक्षित असताना या जागांवर धनदांडग्यानी डल्ला मारल्याचे कल्याणात उघड झालं आहे. कल्याणतील एका खाजगी शाळेत तब्बल २२ धनदांडग्या कुटुंबातील मुलांचे प्रवेश झाल्याचे माहितीच्या अधिकारातून उघड झाले आहे. याबाबत शिक्षण मंडळाने चौकशी सुरू करताच यामधील २  जणांनी शाळेतील प्रवेश रद्द करण्याबाबत अर्ज देखिल केलाय. भ भलतेच लाटतात तर क्वचितच खऱ्या गरजवंताना होतो. असाच काही प्रकार आरटीई म्हणजेच शिक्षण हक्क अधिनियम मध्ये उघडकीस आलाय. प्रत्यक्षात आरटीईअंतर्गत गरीब व गरजू मुलांना प्रवेश देणे बंधनकारक असताना कल्याणातील एका खाजगी शाळेत मात्र आरटीई अंतर्गत २२  धनदांडग्या कुटुंबातील मुलांचा प्रवेश झाल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.

कल्याणातील एका पालकाने आपल्या वकीला मार्फत माहितीच्या अधिकारात आरटीई अंतर्गत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्याच्या कागदपत्राची माहिती घेत शहानिशा केली असता यातील २२ मुलाचे पालक हे उच्च उत्पन्न गटातील असल्याचे आढळून आले. याप्रकरणी त्यांनी शाळेकडे व शिक्षण मंडळा कडे पुराव्यानिशी तक्रार केल्यानंतर  या अर्जाची पडताळणी केली असता काही पालकाचे उत्पन्न वार्षिक १ लाखापेक्षा कितीतरी जास्त असून काही पालकांनी स्वताच्या घरात राहत असतानाही भाड्याच्या घराचे करारपत्र जोडल्याचे तसेच काही पालक आपली माहिती लपवत असल्याचे आढळून आले.

- Advertisement -

यानंतर कल्याण डोंबिवली महानगरपालिका शिक्षणाधिकारी जे जे तडवी यांनी देखील या अर्जाची शहानिशा करत शाळेमध्ये त्या पालकांना बोलून त्यांच्याबरोबर विचारपूस सुरु करत या प्रकरणाची चौकशी सुरू केली.  दरम्यान दोन पालकांनी आपले आरटीईतून प्रवेश मिळविण्यासाठी केलेले अर्ज मागे घेतले.  ही बाब लक्षात आल्यानंतर शिक्षणाधिकाऱ्यांनी तक्रारीची शहनिशा करण्यासाठी सदर पालकांच्या उत्पन्नाची माहिती  कल्याण तहसीलदाराकडे मागितली आहे. त्यांच्याकडून माहिती उपलब्ध झाल्यानंतरच या पालकावर कारवाई करत या योजनेतून देण्यात आलेले प्रवेश रद्द करण्याची कारवाई केली जाणार असल्याचे  सांगितले.


हेही वाचा – धक्कादायक! नाशिकमध्ये सापडले ‘डेल्टा’चे ३० रुग्ण

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -