घरक्राइमनवऱ्याचा नव्या गर्लफ्रेंडचा प्रताप, बायकोने राग काढत पाच मुलांचा केला खून

नवऱ्याचा नव्या गर्लफ्रेंडचा प्रताप, बायकोने राग काढत पाच मुलांचा केला खून

Subscribe

एक महिला जितकं आपल्या पोटच्या गोळ्यावर प्रेम करते तितकं प्रेम इतर कोणावर करत नसावी. तसेच कोणतीही महिला नवऱ्यापासून विभक्त होणे देखील सहन करून शकतं नाही असे देखील म्हटले जाते. जर्मनीतल्या महिलेने असे काही केले जे ऐकून हैरान व्हाल. मिररच्या वृत्तानुसार, महिलेचा पती विभक्त झाला, तर महिलेने रागाच्या भरात आपल्या सहा मुलांपैकी पाच जणांचा खून केल्याचे समोर आले आहे. जर्मनीच्या सोलिंगनमध्ये ही धक्कादायक घटना घडली.

गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये सोलिंगनमध्ये पाच मुलांचा संशयास्पद अवस्थेत मृतदेह आढळला. याप्रकरणाचा आरोप मुलांच्या आईवर करण्यात आला. वुपर्टालच्या जिल्हा न्यायालयात आरोपी आई क्रिस्टियनवर केस सुरू होती. क्रिस्टियनने पाच मुलांच्या जेवणात ड्रग्जचे अधिक मात्रामध्ये डोस दिले आणि त्यानंतर त्यांना बाथरुममध्ये घेऊन जाऊन मारून टाकले.

- Advertisement -

तक्रारदारने असा दावा केला की, ‘क्रिस्टियनने आपल्या मुलांना नाश्तामध्ये विषारी पदार्थ खायला दिले. ज्यानंतर ते बेशुद्ध झाले. मग त्यानंतर आरोपी महिलेने एक-एक मुलाला बाथरुममध्ये घेऊन जाऊन पाण्यात डूबवून मारून टाकले. पाच मुलांमध्ये दोन ते तीन वर्षांची तीन मुलं होती आणि सहा ते आठ वर्षांच्या दोन मुली होत्या. मुलांचा मृतदेह ३ सप्टेंबरला नॉर्थ राइन-वेस्टफेलियामधील फ्लॅटमध्ये मिळाले. सहावे ११ वर्षीय मुलं शाळेत गेले असल्यामुळे महिलेच्या हातून वाचले. महिलेने मुलांना मारून टाकल्यानंतर डसेलडोर्फ सेंट्रल स्टेशनवर रेल्वे समोर उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत होती, परंतु ती वाचली.

क्रिस्टियनने आपल्यावर लावले सर्व आरोप फेटाळून लावले असून फ्लॅटमध्ये एक मास्क घातलेल्या व्यक्तीने प्रवेश करून मुलांना मारून टाकले. पण क्रिस्टियनचा जबाब खरा आहे, असे स्पष्ट करणारे कोणतेही पुरावे नाही आहेत.

- Advertisement -

माहितीनुसार, महिलेचा पतीच्या नव्या गर्लफ्रेंडवरून वाद सुरू होता. तो क्रिस्टियनचा तिसरा नवरा होता, जो या सहा मुलांपैकी चार मुलांचा बाप होता. यामुळेच महिलेने मुलांवर राग काढत त्यांना ठार मारून टाकले. याप्रकरणात महिलेला अटक करण्यात आली आहे.

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -