बलात्कार पीडितेने तडजोड करण्यास दिला नकार; आरोपीच्या पत्नीने जिवंत पेटवले

wife burning

एका बलात्कार झालेल्या पीडितेने तडजोड करण्यास नकार दिल्यामुळे तिच्यावर केरोसिन टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. मध्य प्रदेशच्या बेतुलमध्ये ही खळबळजनक घटना घडली आहे. ही घटना बलात्कार करणाऱ्या आरोपीच्या पत्नीमुळे घडली आहे. तिने पीडितेवर फक्त केरोसिन टाकले नाही तर तिला जबरदस्तीने एक औषध पाजले आणि तिला बेशुद्ध केले. पीडितेच्या गंभीर प्रकृतीमुळे तिला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पीडितेची आई आणि पोलिसांच्या माहितीनुसार, मुलताई ठाणे परिसरातील प्रभातपट्टन क्षेत्रात ही घटना घडली आहे. शुक्रवारी पीडित तरुणी सकाळी शौचासाठी शेताच्या दिशेने जात होती. तेव्हा गावातील राहणाऱ्या आरोपीच्या पत्नीने तिला जबरदस्ती पकडून तिच्यावर केरेसिन टाकले. एवढेच नाहीतर त्यानंतर तिला एक औषधं पाजवून बेशुद्ध केले. त्यानंतर पीडितेला बेशुद्ध अवस्थेत पाहून गावातल्या लोकांनी कुटुंबियांना सांगितले. मग तरुणीला बेशुद्ध अवस्थेत प्रभातपट्टन सीएचसीमध्ये भरती केले. पण पीडितेची प्रकृती गंभीर झाल्यामुळे तिला जिल्ह्या रुग्णालयात दाखल केले आहे. सध्या तिच्यावर उपचार सुरू आहेत.

ही घटना ज्या महिलेमुळे घडली तिचा पती विजय बिहारेवर १३ ऑगस्ट २०२०ला तरुणीवर बलात्कार केल्याची तक्रार दाखल आहे. याप्रकरणी तो जेलमध्ये गेला होतो. पण तो पुन्हा परत आला आणि पीडितेच्या कुटुंबियांवर तडजोड करण्यासाठी दबाव टाकू लागला.

पीडितेची आई म्हणाली की, जेव्हा तरुणी सकाळी शौचास गेली होती तेव्हा आरोपीची पत्नी आणि तिच्यासोबत चार ते पाच लोकं होते. काहींनी पीडितेवर केरोसिन टाकले. तर काहींनी तिचा बेशुद्ध करण्याचे औषध पाजवून तिला मारहाण केली. आरोपी जेलमधून परत आल्यापासून सतत तडजोड करण्यासाठी दबाव टाकत होता आणि सतत धमकी देत होता. दरम्यान आता पोलीस याप्रकरणी तपास करत आहे.


हेही वाचा – धक्कादायक! पुण्यात डॉक्टर महिलेच्या बेडरुम, बाथरुम तसेच मोबाईल चार्जर आणि LED बल्बमध्ये छुपे कॅमेरे