तक्रार दाखल केल्याने खासदाराकडून हातपाय तोडण्याची धमकी

वारंवार तक्रार केल्यामुळे खासदान इम्तियाज जलील आणि बांधकाम विभागाचे सहाय्यक अभियंता अशोक येरेकर यांनी तक्रार दाराला हातपाय तोडण्याची धमकी दिली

MP imtiaz jaleel threatens to activist sachin kadam over complaint file in road work
तक्रार दाखल केल्याने खासदाराकडून हातपाय तोडण्याची धमकी

राज्यातील रस्त्यांची चाळण झाली आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालय ते विद्यापीठ गेटपर्यंतच्या रस्त्याचे काम सुरु आहे. परंतु या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याची तक्रार रिपब्लिकन विद्यार्थी सेनेचे मराठवाडा प्रदेशाध्यक्ष सचिन अशोक निकम यांनी पोलिसांना आयुक्तांना निवेदनात केली होती. वारंवार तक्रार केल्यामुळे खासदान इम्तियाज जलील आणि बांधकाम विभागाचे सहाय्यक अभियंता अशोक येरेकर यांनी तक्रार दाराला हातपाय तोडण्याची धमकी दिली आहे. असा आरोप तक्रारदाराने केली आहे. राज्यात सर्वच रस्त्यांची कामे ही निकृष्ट दर्जाचे होत असतात. त्यामुळे राज्यातील नागरिकही निकृष्ट रस्त्यांमुळे त्रस्त झाले आहेत.

रिपब्लिकन विद्यार्थी सेनेचे मराठवाडा प्रदेशाध्यक्ष सचिन निकम यांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ.बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालय ते विद्यापीठ प्रवेशद्वारापर्यंत रस्त्याचे काम सुरु आहे. या रस्त्याचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे होत असल्याची वारंवार तक्रार आणि रस्त्याचे बांधकाम थांबवण्याची मागणीही बांधकाम विभागाकडे केली आहे. परंतु तक्रार दाखल केल्याच्या रागामुळे खासदार इम्तियाज जलील आणि बांधकाम विभागाचे सहायक अभियंता अशोक येरेकर यांनी आपल्याला हातपाय तोडण्याची आणि शासकीय कामात अडथळा आणल्यामुळे गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली असल्याचे सचिन निकम यांनी सांगितले आहे.

सचिन निकम यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, रस्त्याच्या बांधकामाबाबत तक्रार केल्यामुळे खासदार इम्तियाज जलील आम्हाला धमकी देत आहे. खासदारांच्या दबावामुळे प्रशासन आमच्यावर खोटा गुन्हा नोंदवू शकते. या बाबत एक व्हिडीओही सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत असे दिसत आहे की, खासदार इम्तियाज जलील यांना रिपाई विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते रस्त्याच्या कामाबाबत जाब विचारत आहेत.