घरक्राइमदोन पत्नींसोबत लाईव्ह सेक्स स्ट्रीमिंग करुन लाखो कमवले; एका पत्नीनं फोडलं बिंग

दोन पत्नींसोबत लाईव्ह सेक्स स्ट्रीमिंग करुन लाखो कमवले; एका पत्नीनं फोडलं बिंग

Subscribe

पैसे कमविण्यासाठी लोक काय करतील, याचा काही नेम नाही. तंत्रज्ञानाचा विकास जसा मानवाच्या प्रगतीसाठी महत्त्वाचा मानला जातो. तसे तंत्रज्ञानाचा वापर वाममार्गासाठीही होत आहे. मध्य प्रदेशमधून अशीच एक चक्रवणारी बातमी समोर आली आहे. विदिशा जिल्ह्यात दोन पत्नी असणाऱ्या एका पतीला अटक करण्यात आली आहे. हा माणूस आपल्या दोन पत्नींसोबत अश्लिल चाळे करत असतानाचे लाईव्ह स्ट्रिमिंग करायचा. हे लाईव्ह स्ट्रिम पाहण्यासाठी तो पैसे आकारायचा. या मार्गातून त्याने आतापर्यंत लाखो रुपये कमवले आहेत. या व्यक्तिच्या दुसऱ्या पत्नीने पतीच्या त्रासाला कंटाळून पोलिसांत तक्रार दिल्यानंतर या प्रकरणाचे बिंग फुटले. यानंतर पोलिसांनी शनिवारी आरोपी पतीला अटक केली आहे.

विदिशाच्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा आरोपी केवळ दहावी पर्यंत शिकलेला आहे. त्याचे वय २४ असल्याचे सांगितले जाते. मात्र तंत्रज्ञानाचे चांगले ज्ञान असल्यामुळे त्याला ही कल्पना सुचली. डेटिंग Appsवर तो भलताच Active असायचा या Appsमधूनच तो पैसे कमवत होता. एका पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने डेटिंग Apps वर डीपी सेट केला होता. त्यावर जो कुणी लाईक करायचा, त्या युजरला आरोपी एक मेसेज पाठवायचा. सेक्सच्या डेमोसाठी तो १०० रुपये घ्यायचा. तर पुढील वेगवेगळ्या क्लिपसाठी तो ५००, ७०० पासून ते १००० रुपयांपर्यंत चार्ज घ्यायचा. तसेच चेहरा दाखवून आणि न दाखवता लाईव्ह स्ट्रिमचेही वेगवेगळे चार्जेस लावले जायचे.

- Advertisement -

आरोपीने २८ ऑगस्ट रोजी बँकेत अकाऊंट उघडले होते. या खात्यात ६ लाख रुपयांचा व्यवहार झाल्याचे निदर्शनास आले आहे. पोलिसांनी सांगितल्यानुसार आरोपी दररोज ३ ते ४ हजारांची कमाई करत होता.

आरोपीची पहिली पत्नी बंगळुरु येथील असून ती सात महिन्यांची गर्भवती आहे. सोशल मीडियावर ओळख झाल्यानंतर दोघांनी लग्न केले होते. आरोपीची दुसरी पत्नी उत्तर प्रदेशमधील असून ती अध्यात्मिक प्रवृत्तीची असल्याचे सांगितले जाते. ती एका धर्मगुरुची अनुयायी देखील आहे. आरोपीने मोठ्या चलाखीने या धर्मगुरुचे आपण भक्त असल्याचे सांगत तिच्याशी लग्न केले होते. काही दिवस संबंध ठेवल्यानंतर त्यांनी मंदिरात लग्न केले होते.

- Advertisement -

पोलिसांनी आरोपीच्या या कृत्याचा तपशील देताना सांगितले की, पहिल्या पत्नीला आरोपीच्या चाळ्यांशी कोणतीही तक्रार नव्हती. पत्नीला पैशांचे आमिष दाखवून त्याने सेक्स स्ट्रिमिंगसाठी तयार केले होते. मात्र दुसऱ्या पत्नीला हे मंजूर झाले नाही. चौकशीदरम्यान आरोपीने दोन्ही पत्नींसोबत लाईव्ह सेक्स स्ट्रिमिंग केले असल्याचे मान्य केले आहे. पोलिसांच्या तपासात आरोपीकडून १२ लाखांचे दागिने आणि इतर ऐवज जप्त करण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -