घरCORONA UPDATEMumbai Corona Update: मुंबईत कोरोना रुग्ण दुप्पटीचा दर १२०० दिवसांहून अधिक, गेल्या...

Mumbai Corona Update: मुंबईत कोरोना रुग्ण दुप्पटीचा दर १२०० दिवसांहून अधिक, गेल्या २४ तासात ८ रुग्णांचा मृत्यू

Subscribe

मुंबईत आतापर्यंत एकूण ७ लाख ३३ हजार ११५ कोरोनाबाधितांची नोंद

मुंबईत कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. मुंबई पालिका क्षेत्रामध्ये सध्या ५ हजार ७७९ कोरोनाबाधितांवर उपचार सुरु आहेत तर मागील २४ तासात एकूण ३७४ कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. मुंबईतील कोरोनाबाधितांच्या संख्येत घट झाल्यामुळे मुंबईकरांना चांगलाच दिलासा मिळाला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या उपाययोजनांमुळे मुंबईतील कोरोना परिस्थितीती आटोक्यात आली असल्याचे दिसतं आहे. मुंबईत मागील १४ तासात ८ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. सध्या असलेली कोरोनाची परिस्थिती कायम राहिली तर मुंबईतील कोरोना हद्दपार करण्यास यश मिळू शकते.

मुंबईत आतापर्यंत एकूण ७ लाख ३३ हजार ११५ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर ७ लाख ९ हजार १९८ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. मागील २४ तासात मुंबईत ४८२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मुंबईतील मृत कोरोनाबाधितांची संख्या आता १५ हजार ७५७ झाली असून मागील २४ तासात ८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंबईतील कोरोनाबाधितांच्या मृत्यू संख्येत कमालीची घट झाली असून गेल्या काही दिवसांपासून ही मृत्यू संख्या कमी झाली असल्याचे निदर्शनास आले आहे.

- Advertisement -

मुंबईतील कोरोना चाचण्या वाढवण्यात आल्या आहेत. परंतू गेल्या १४ तासात मुसळधार पावसामुळे कोरोना चाचण्यांमध्ये ३ हजारांची घट झालेली पाहायला मिळत आहे. मागील २४ तासात २७ हजार १३१ कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. तर आतापर्यंत फक्त मुंबई पालिका क्षेत्रात ७८ लाख ९८ हजार ७०८ कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. मुंबईत मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी २ रुग्णांना काही दीर्घकालीन आजार होते. ६ रुग्ण पुरुष व २ रुग्ण महिला होते. तर ५ रुग्णांचे वय ६० वर्षांवर होते. उर्वरित ३ रुग्ण ४० ते ६० वयोगटामधील होते.

- Advertisement -

मुंबईतील कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर ९७ टक्क्यांवर गेला आहे. तर १६ जुलै ते २२ जुलै २०२१ पर्यंत मुंबईतील एकूण कोविड वाढीचा दर ०.०५ टक्के आहे. मुबईमधील कोरोना रुग्ण दुप्पटीचा दर १२०९ दिवसांवर गेला आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -