घरक्राइमबायकोला मनवण्यासाठी त्याने मुलाला चढवलं तिरडीवर तर मुलीला फासावर!

बायकोला मनवण्यासाठी त्याने मुलाला चढवलं तिरडीवर तर मुलीला फासावर!

Subscribe

नाराज बायकोला मनवण्यासाठी लोकं काय-काय करतात हे प्रत्येकालाच माहित आहे. परंतु एका व्यक्तीने बायकोला मनवण्यासाठी असं काही केलं आहे, जे ऐकून तुम्ही हैराण व्हालं. या व्यक्तीने बायको नाराज होऊन माहेरी गेल्यामुळे तिला परतत आणण्यासाठी आपल्या मुलांचा जीव पणाला लावला. त्याने मुलीच्या गळ्यात फास लटकवला तर मुलाला तिरडीवर झोपवले आणि बायकोला दोघांचे फोटो पाठवून दिले. ही धक्कादायक घटना मुंबईतील कुरार पोलीस स्टेशन क्षेत्रात घडली आहे.

नक्की काय घडले?

मुंबईतील हा व्यक्ती व्यसनाधीन होता. सतत व्यसन करून आपल्या बायको आणि मुलांना मारहाण करत असायचा. यामुळे बायको मुलांना घेऊन मुंबई सोडून गावाला निघून गेली होती आणि त्यानंतर ती परतली नाही. आरोपीचा भावाने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, नुकताच तो १३ वर्षांची मुलगी आणि ८ वर्षांच्या मुलाला मुंबईत घेऊन आला होता. यादरम्यान शनिवार सकाळी त्याने मुलाला जमिनीवर झोपवले. त्यानंतर त्याच्यावर पांढरा कपडा घालून आणि त्याला हार घातला. मग अगरबत्ती पेटवून त्याला जीवंतपणे मारून फोटो काढले आणि बायकोला पाठवले.

- Advertisement -

याशिवाय त्याने मुलीला ओढणीने फासावर लटकवून खाली ठेवलेल्या बादलीला बाजूला काढायला सांगितले. पण मुलीने बादली काढण्यास मनाई केली, तेव्हा त्याने पंखा चालू करण्याची तिला धमकी दिली. त्यानंतर मुलगी ओरडू लागली. त्यामुळे आजूबाजूचे लोकं तिचा आवाज ऐकूण घरात घुसले. त्यावेळेस मुलगी पंख्याला लटकून रडत होती. हे सगळे भयानक दृश्य पाहून आजूबाजूच्या लोकांनी त्याला मारून बाहेर काढले आणि मुलीला सुखरुपणे खाली उतरवले.

या घटनेबाबत लोकांनी पोलिसांना सांगितले. तसेच यापैकी एकाने व्यक्तीने त्याच्या बायकोलाही याबाबत कळवले. मग पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून या व्यक्तीला ताब्यात घेतले आणि त्याच्याविरोधात हत्या करण्याच्या प्रयत्नासंदर्भातील गुन्हा दाखल केला. चौकशी दरम्यान आरोपीने स्वतः सांगितले की, ‘नाराज बायकोला गावावरून पुन्हा मुंबईला बोलवण्यासाठी खोटा कट रचत होता.’

- Advertisement -

हेही वाचा – फेसबुक फ्रेंडशिप पडली महाग, ५६ लाखाचा लावला चुना


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -