घरक्राइमक्रूझ ड्रग्स पार्टीप्रकरणी शाहरूखच्या मुलाला कोठडी

क्रूझ ड्रग्स पार्टीप्रकरणी शाहरूखच्या मुलाला कोठडी

Subscribe

हे संस्काराचे फळ तर नाही ना?

क्रूझ ड्रग्स पार्टीप्रकरणी बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला रविवारी एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आर्यन खानसह अरबाज मर्चंट आणि मुनमुन यांनाही एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. एनसीबीच्या वकिलांनी या आरोपींची दोन दिवसांची कोठडी मागितली होती. मात्र, कोर्टाने या तीन आरोपींना एक दिवसाची कोठडी दिली. आता उर्वरित पाचजणांनाही रात्री उशीरा अटक करण्यात आली. त्यात नुपूर सारिका, इश्मित सिंह, विक्रांत चोकर, गोमित चोपडा, मोहक जसवाल यांचा समावेश आहे. त्यांना सोमवारी कोर्टात हजर करण्यात येणार आहे. ज्येष्ठ वकील सतिश माने-शिंदे यांनी कोर्टात आर्यनची भूमिका मांडली.
एनसीबीने अरबाज खानसह त्याच्या साथीदार अरबाज मर्चंट आणि मुनमुन या आरोपींची दोन दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती. मात्र, किला कोर्टाने केवळ एक दिवसाची कोठडी मान्य केली आहे. त्यामुळे एनसीबीला आता चौकशीसाठी फक्त एक दिवस मिळाला आहे. एनसीबी एक दिवसाच्या कोठडीत काय तपास करते, त्या तपासातून एनसीबीच्या हाती नेमके काय लागते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. ड्रग्ज प्रकरणाच्या लिंक कुठपर्यंत जातात ते आता तपासातून समोर येईल.

विशेष म्हणजे तीनही आरोपी एकमेकांना ओळखतात. त्यांच्यामध्ये पैशांचे व्यवहार झालेले आहेत. त्यामुळे हे सगळे ड्रग्स त्यांच्याकडे कुठपर्यंत आले, कुणाच्या माध्यमातून आले? याचा तपास करण्यासाठी एनसीबीने दोन दिवसांच्या कस्टडीची मागणी केली होती. पण कोर्टाने एका दिवसाची कस्टडी सुनावली आहे. उर्वरित पाच आरोपींना एनसीबी कदाचित सोमवारी हजर करण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

आर्यनकडे बोर्डिंग पासही नव्हता. त्याला त्या पार्टीचे निमंत्रण आले होते. तसेच त्याच्याकडे कोणत्याही पद्धतीचे ड्रग्स सापडले नाही. त्यामुळे दोन दिवसांची कस्टडी न देता एकाच दिवसाची कस्टडी द्यावी, असा युक्तिवाद वकील सतिश माने-शिंदे यांनी कोर्टात केला. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर कोर्टाने तीनही आरोपींना एक दिवसाची कोठडी सुनावली.

पार्टीत कोकेन, एमडी, चरस सारखे ड्रग्स

एनसीबी अधिकार्‍यांना कोकेन, एमडी, चरस सारखे ड्रग्स पार्टीत मिळाले आहेत. त्यामुळे तपासासाठी दोन दिवसांची कस्टडी एनसीबीच्या अधिकार्‍यांनी मागितली होती. आजच्या चौकशीत नेमकी काय माहिती बाहेर येते ते पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे. तसेच त्याच माहितीच्या आधारे एनसीबी आणखी कोठडी मागण्याची शक्यता आहे. याशिवाय उर्वरित पाच आरोपींनाही उद्या नियमित न्यायालयात हजर केले जाईल. त्यांचा नेमका रोल काय ते अद्याप स्पष्ट झालेले नाही.

- Advertisement -

मोठी प्रवेश फी

या पार्टीसाठी तगडी फी वसूल करण्यात आली होती. ज्या जहाजावर ही पार्टी सुरू होती, ते जहाज कॉर्डेलिया क्रूझ कंपनीचे होते. ही पार्टी फॅशन टीव्ही इंडिया आणि दिल्लीच्या मानस्क्रे एक्सपिरियन्स नावाच्या कंपनीने आयोजित केली होती. भर समुद्रात होणार्‍या या पार्टीसाठी 60 हजारांपासून ते 5 लाखांपर्यंतची फी ठेवण्यात आली होती.

हे संस्काराचे फळ तर नाही ना?

आर्यन शाहरूख खान याला ड्रग्स घेतल्याप्रकरणी एनसीबीने अटक केल्यानंतर एक व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली. ही क्लिप सिने अभिनेत्री सिमी गरेवाल यांनी १९९७ साली शाहरूख आणि त्याची पत्नी गौरी यांच्या घेतलेल्या मुलाखतीची आहे. ट्विटर युजर प्रिया कुलकर्णी यांनी ही क्लिप शेअर केली आहे. त्यात गौरी खान मस्करीत सिमी गरेवाल यांना सांगतात की, त्यांचा मुलगा आर्यन हा शाहरूख खानच्या खूप जवळ असून शाहरूख त्याचे आयुष्य उद्ध्वस्त करणार आहे. २७ मिनिटांच्या संभाषणात सिमी गरेवाल शाहरूख खानला प्रश्न विचारतात की, तू आपल्या मुलाचे आयुष्य कसे काय, उद्ध्वस्त करणार आहेस, त्यावर शाहरूख म्हणतो, आर्यन तीन ते चार वर्षांचा असताना मी त्याला सांगितले की, तू मुलींच्या पाठी जा, तुला वाटेल तेव्हढ्या सिगरेट ओढ, ड्रग्स घे, सेक्स कर, वूमनाईज हो… त्यावर गरेवाल विचारतात, जेव्हा तो तीन वर्षांचा होता तेव्हा?.. त्यावर गौरी शाहरूख खान हसतात आणि म्हणतात, हो!.. आर्यनने ते सर्व करावे जे मी नाही केले, असे शाहरूख खान त्यावर हसत हसत उत्तरतो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -