घरताज्या घडामोडीMumbai-Goa Highway : मुंबई-गोवा महामार्गावर एसटी आणि कारमध्ये भीषण अपघात

Mumbai-Goa Highway : मुंबई-गोवा महामार्गावर एसटी आणि कारमध्ये भीषण अपघात

Subscribe

3 जखमींपैकी 2 जण गंभीर

मुंबई-गोवा महामार्गावरील पेण तालुक्यातील जिते गावच्या हद्दीत एसटी आणि कारमध्ये भीषण अपघात झाला.या अपघातात तीनजण जबर जखमी झाले असून, यापैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे. शुक्रवार ५ नोव्हेंबरच्या सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास सदर दुर्घटना घडली आहे.पनवेल-अलिबाग एसटी आणि कारमध्ये हा भीषण अपघात झाला. सदर अपघाताची माहिती मिळताच अपघातग्रस्तांचे वाली कल्पेश ठाकूर यांनी आपल्या रुग्णवाहिकेसह तात्काळ घटनास्थळी मदतीसाठी धाव घेतली.अपघातात जखमी झालेल्या पती, पत्नी व सासू या तिघांना त्यांनी त्यांच्या रुग्णवाहिकेतून पेण सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
यावेळी सरकारी हॉस्पिटलमध्ये उपस्थित असलेले डॉक्टर अभिजित पाटील यांनी अपघातग्रस्तांवर प्राथमिक उपचार करून तिघांनाही अलिबाग किंवा मुंबई येथे हलविण्यास सांगितले. मात्र अपघातग्रस्त हे बिहार येथून कोकणात फिरायला आल्याने आणि नातेवाईक जवळ नसल्याने सदर तीनही जखमींना पुढील उपचारासाठी साई सहारा प्रतिष्ठानच्या मोफत रुग्णवाहिकेतून एम.जी.एम.कामोठे येथील हॉस्पिटलमध्ये दाखल केले.
सदर अपघाताची नोंद दादर सागरी पोलीस ठाण्यात केली असून, एसटी चालकास ताब्यात घेतले आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक गोविंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दादर सागरी पोलीस अधिक तपास करीत आहेत. दरम्यान, अपघातानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तर दुसरीकडे अपघातामुळे काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. 


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -