घरताज्या घडामोडीमुंबई महापालिका आयुक्त इकबाल चहल यांचा कोविड क्रुसर्डस पुरस्काराने गौरव!

मुंबई महापालिका आयुक्त इकबाल चहल यांचा कोविड क्रुसर्डस पुरस्काराने गौरव!

Subscribe

मुंबईतील कोरोना परिस्थिती नेटाने हाताळली , इंडो अमेरिकन चेेंबर ऑफ कॉमर्सकडून गौरवित

मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल चहल यांना यंदाचा इंडो अमेरिकन चेेंबर ऑफ कॉमर्स पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. जगभरात पसरलेल्या कोरोना संकटकाळात मुंबईतील कोरोनाची परिस्थिती नेटाने हाताळल्याबाबत इकबाल चहल यांचा हा गौरव करण्यात आला आहे. याबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विटरवर शुभेच्छा देत त्यांना गौरवण्यात आलेल्या ट्रॉफीचा फोटो शेअर केला आहे. शुक्रवारी ऑनलाईन पद्धतीने पार पडलेल्या कार्यक्रमात त्यांना हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. कोविड क्रुसर्डस अवॉर्ड २०२० हा पुरस्कार इकबाल चहल यांना बहाल करण्यात आला आहे. या ऑनलाईन कार्यक्रमाला राज्यपाल भगतसिंह कोश्यारीदेखील उपस्थित होते.

जगासह देशालाही कोरोनाच्या विषाणूने विळखा घातला असताना भारतात महाराष्ट्रामध्ये सुरुवातीपासूनच कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून येत आहेत. त्यातच मुंबई या देशाच्या आर्थिक राजधानीत कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढू लागली होती. ही रुग्णसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने राज्य सरकारच्या सोबत मिळून विविध उपक्रम अंमलात आणले. मात्र मुंबईची स्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून मुंबई महापालिका आयुक्त प्रवीणसिंह परदेशी यांची बदली देखील करण्यात आली आणि त्यांच्या जागी इकबाल चहल यांची कोरोना संकटकाळात नियुक्ती करण्यात आली होती. धारावी भागात याआधी काम केल्याचा अनुभव गाठीशी असल्याने चहल यांनी प्रथम या भागावर लक्ष्य केंद्रित करत प्रभावी उपाययोजना करायला सुरुवात केली. मुख्य म्हणजे ते स्वतः फिल्डवर असल्याने सारी महापालिका यंत्रणा कामाला लागली. याचा परिणाम होऊन धारावीच नव्हे तर आसपासच्या परिसरात कोरोनाचा वेगाने होणारा प्रसार थांबला.

- Advertisement -

इकबाल चहल हे पालिका आयुक्तपदी आले तेव्हा धारावी, माटुंगा, वरळी परिसरात कोरोना रुग्णांचा आकडा तिपटीने वाढत होता. चहल यांनी सूत्र हाती घेताच ऑन फिल्ड उतरून काम करण्यास सुरुवात केली. धारावी, कुरार व्हिलेज सारख्या परिसरात ते फिरले. तसेच कोरोना सेंटर्समध्ये जाऊन त्यांनी रुग्णांनी आरोग्य तज्ज्ञांची भेटही घेतली. अजूनही त्यांच्या कामाचा सपाटा सुरू आहे. त्यांच्या प्रयत्नाने मुंबईतील कोरोनाची स्थिती नियंत्रणात आली असून कोरोना संसर्ग होण्याचे प्रणाम कमी झाल्याचे सांगितले जात आहे.

आजही मुंबईच्या ज्या भागात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे हे लक्षात येताच त्याला रेड झोन जाहीर करत चहल त्या ठिकाणी स्वतः काम करत आहेत. यामुळे आता मुंबईत झोपडपट्टी तसेच चाळींमधील कोरोना आटोक्यात येत असल्याचे चित्र आहे. मात्र, त्याचवेळी सोसायटी तसेच मोठ्या इमारतींमध्ये कोरोना पसरत चालला आहे, असेही दिसून येत आहे. कोरोनाच्या अशा चढ-उतार प्रसाराचा नीट अभ्यास करत त्यावर मात करण्यासाठी चहल करत असलेले प्रयत्न या सर्वांचा विचार करून त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -