घरक्राइमDrug Case : मुंबई पोलिसांच्या समन्सनंतरही पूजा ददलानी गैरहजर, कारण...

Drug Case : मुंबई पोलिसांच्या समन्सनंतरही पूजा ददलानी गैरहजर, कारण…

Subscribe

एनसीबीच्या एसआयटी पथकाची फिनिक्स मॉलमध्ये पाहणी

क्रूझ ड्रग्ज प्रकरणात आर्यन खानच्या सुटकेसाठी खंडणी प्रकरणात आता मुंबई पोलिसांकडून कारवाईला वेग आला आहे. आर्यनच्या सुटकेसाठीच्या खंडणी प्रकरणात आता मुंबई एसआयटी कडून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या प्रकरणात मुंबई पोलिसांकडून शाहरूख खानची मॅनेजर पूजा ददलानीला समन्स पाठविण्यात आला आहे. पण तब्येतीचे कारण देत पूजा ददलानी या प्रकरणात हजर राहणार नसल्याचे कळते आहे. पूजा ददलानीच्या जबाबनंतर या प्रकरणात आणखी हालचालीला वेग येईल, अशी माहिती आहे.

मुंबई पोलिसांच्या एसआयटी ने शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानीला समन्स पाठवून आज चौकशी बोलावले आहे. पूजा ददलानीचा जबाब नोंदवून मुंबई एसआयटी कडून आज खंडणी आणि अपहरणाचा गुन्हा दाखल करण्याची दाट शक्यता आहे. या गुन्हयात मुख्य आरोपी किरण गोसावीअसणार असून व इतरांना सहआरोपी करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पण तब्येत बरी नसल्याचे कारण देत पूजा ददलानी या समन्ससाठी हजर राहणार नसल्याचे कळते.

- Advertisement -

पूजा ददलानीला या गुन्ह्यातील फिर्यादी तर प्रभाकर साईल हा मुख्य साक्षीदार म्हणून असणार आहे. प्रभाकर साईलच्या गौप्यस्फोटानंतरच किरण गोसावी, सॅम डिसूझा आणि पूजा ददलानी यांच्यातील डील समोर उघडकीस आली होती. आर्यनच्या सुटकेसाठी २५ कोटींची डील झाल्याचा आरोप साईलने केला होता. या डीलमध्ये १८ कोटींवर मांडवली होतानाच, त्या डीलमधील ८ कोटी हे एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडेंना देण्यात येणार होते, असा खळबळजनक खुलासाही साईलने केला होता.

एनसीबीची एसआयटी पथक देखील सक्रिय झाली असून आज एनसीबीच्या विशेष पथकाकडून मोठ्या घडामोडी होण्याची शक्यता आहे. एनसीबीचे उपमहासंचालक ज्ञानेश्वर सिंह यांनी लोअर परळ येथील फिनिक्स मॉल परिसराची पाहणी केली आहे. या परिसरात पूजा ददलानी आणि किरण गोसावी यांच्या १८ कोटींची डील झाली होती या ठिकाणचे फुटेज एनसीबी कडून तपासले जाणार आहे.

- Advertisement -

NCB ची SIT 

एनसीबीच्या एसआयटी कडून आर्यन खान सह अनेकांना चौकशीसाठी समन्स बजावले असून त्यात पूजा ददलानीचा समावेश आहे.क्रूझ ड्रग्स प्रकरणातील आरोपी आणि साक्षीदार यांचा देखील पुन्हा जबाब नोंदवण्यात येणार असून लवकरच या प्रकरणाचा तपास पूर्ण करून वरिष्ठना अहवाल सादर करायचा असल्याचे सिंह यांनी म्हटले आहे.


हेही वाचा – Cruise Drug Case : आर्यन जामीन प्रकरण, शाहरुखची मॅनेजर पूजा ददलानीचा CCTV व्हिडिओ SIT पथकाच्या हाती

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -