घरक्राइमDrug's साठीचा एक महिन्याचा सापळा यशस्वी, मुंबईत २४ किलो चरस हस्तगत

Drug’s साठीचा एक महिन्याचा सापळा यशस्वी, मुंबईत २४ किलो चरस हस्तगत

Subscribe

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोची ड्रग्ज क्रूझ प्रकरणाला आता नवे वळण लागले असतानाच दुसरीकडे मात्र मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रॅंचने अंमली पदार्थ शोध मोहिमेत दमदार कामगिरी केली आहे. मुंबईच्या टोल नाक्यावर कोट्यावधींचे ड्रग्ज हस्तगत करण्यात मुंबई पोलिसांना यश आले आहे. महत्वाचे म्हणजे या ड्रग्जच्या तस्करीसाठी महिलांचाही वापर केला गेल्याचे समोर आले आहे. मुंबईतील दहिसर टोल नाक्यावर मुंबई पोलिसांनी सापळा रचून ही कामगिरी केली आहे. कारवाई दरम्यान ४ जणांना अटक करण्यात आली आहे.

मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रॅंच युनिट नंबर ६ ने दहिसर चेक नाका येथे अमली पदार्थ तस्करीसाठीचा सापळा रचला होता. जवळपास एक महिन्यापासून या तस्करीसाठीची वाट मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने पाहिली. मुंबईच्या प्रवेश द्वाराजवळ म्हणजे दहिसर येथे हे युनिट या तस्करीच्या ड्रग्जची वाट पाहत होते. राजस्थानातून मुंबईत आणलेले ड्रग्ज जेव्हा दहिसर टोलनाक्यावर आले तेव्हा, क्राईम ब्रॅंचच्या टीमने या प्रकरणात चौघांना अटक केली. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये 2 पुरुष आणि 2 महिलांचा समावेश आहे. सर्व आरोपी पवई येथील रहिवासी आहेत. मुंबई क्राईम ब्रँच युनिट 6 ने दहिसर चेक नाका येथून 24 किलो चरससह 4 जणांना अटक केली आहे. या जप्त केल्ल्या ड्रग्जची किंमती १ कोटी ४४ लाख रूपये आहे.

- Advertisement -

या ड्रग्ज तस्करीबाबत खुलासा करणारी पत्रकार परिषद गुन्हे शाखेचे डीसीपी दत्ता नलावडे यांच्याकडून घेण्यात येणार आहे. त्यामध्ये अधिक तपशीलासह माहिती देण्यात येईल असे कळते. मुंबईत सध्या एनसीबीच्या क्रूझ ड्रग्ज प्रकरणातील कारवायांवर संशयाची सुई आलेली असतानाच दुसरीकडे मुंबई पोलिसांच्या कामगिरीचे मात्र कौतुक होत आहे. तब्बल १ महिन्यापासून या प्रकरणात मुंबई पोलिसांच्या टीमने घेतलेली मेहनत अखेर यशस्वी ठरलेली आहे.


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -