घरक्राइमसंतापजनक! आई-मुलांनीच दिली वडिलांची सुपारी; कुऱ्हाडीने घातले घाव

संतापजनक! आई-मुलांनीच दिली वडिलांची सुपारी; कुऱ्हाडीने घातले घाव

Subscribe

आई-मुलांनी मिळूनच वडिलांची सुपारी दिल्याची धक्कादायक घटना नांदेड शहरात घडली आहे.

आई-मुलांनी मिळूनच वडिलांची सुपारी दिल्याची धक्कादायक घटना नांदेड शहरात घडली आहे. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. व्यसनाधीन झालेल्या पित्याला कंटाळलेल्या मुलाने आपल्या आईच्या मदतीने वडिलांचा खून केल्याची घटना समोर आली आहे. गेल्या दीड वर्षापूर्वी ही घटना घडल्याचे आता उघड झाले आहे. १४ ऑगस्ट २०१९ रोजी नांदेड शहरातील सरपंच नगर भागात शरद कुऱ्हाडे नावाच्या इसमाचा मृतदेह राहत्या घरी सापडला होता. दरम्यान, पत्नीने दिलेल्या फिर्यादीवरुन भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद देखील करण्यात आली. चौकशी दरम्यान आई आणि मुलांनी मिळून हत्या केल्याचे उघडकीस आले आहे.

नेमके काय घडले?

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार; शरद कुऱ्हाडे दारुच्या आहारी गेले होते. नशेत असताना ते आई-मुलांना मारहाण करायचे. तसेच त्यांनी व्यसनाच्या आहारी घर विकण्याचाही विचार केला होता. सततच्या मारहाणीला आई आणि मुलगा हैराण झाले होते. अखेर त्यांनी वडिलांचा काटा काढण्याचे ठरवले. याकरता पत्नी आणि मुलांने तब्बल १ लाख रुपयाची सुपारी दिली होती. यामध्ये हत्येची सुपारी घेणारी मुलेही खून झालेल्या व्यक्तीच्या मुलाचे अल्पवयीन मित्र असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी पत्नी अश्विनी कुऱ्हाडे, १८ वर्ष वय असलेल्या तीन अल्पवयीन मुलांसह एकूण सहाजणांना अटक करण्यात आली आहे.

- Advertisement -

दरम्यान, शवविच्छेदनानंतर अधिक तपासणीसाठी अहवाल प्रयोगशाळेत पाठवण्यात आला होता. दरम्यानच्या काळात या घटनेबाबत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सखोल तपास करण्याचे आदेश दिले. शवविच्छेदन अहवालात कुऱ्हाडे यांच्या शरीरावर तिक्ष्ण हत्यारांचे १४ वार होते. यामुळे पोलिसांचा संशय बळावला आणि त्यांनी संशयितांना ताब्यात घेऊन पुन्हा चौकशीला सुरुवात केली. या चौकशीत शरद कुऱ्हाडे यांच्या आत्महत्येचा बनाव उघड झाला आहे.


हेही वाचा – रिक्षा चालकाची मुलगी मान्या सिंह ठरली ‘Miss India 2020’ रनर अप

- Advertisement -

 

Pradnya Ghogalehttps://www.mymahanagar.com/author/pradnya/
पत्रकारितेत ५ वर्ष पूर्ण. प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये काम करण्याचा अनुभव. सामाजिक, आरोग्यविषयक विषयांवर लिहिण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -