UPW VS GGTW : गुजरात जायंट्सने 6 विकेटने जिंकला सामना
18 षटकात 144 धावांचे लक्ष्य गाठले
16/2/2025 21:50:24
परभणीत ट्रकचालकाने 3 वाहनांना उडवले
परभणी-गंगाखेड महामार्गावरील घटना
दुर्घटनेत एकाचा मृत्यू तर तीन जण जखमी
अपघातानंतर संतप्त जमावाने ट्रक पेटवला
16/2/2025 21:3:16
ठाकरे गटाने रत्नागिरी जिल्हा प्रमुखपदी केली दत्ता कदम यांची निवड
कोकणातील पडझडीनंतर शिवसेना ठाकरे गटाचे डॅमेज कंट्रोल
रत्नागिरी जिल्हा प्रमुख पदी दत्ता कदम यांची निवड
पुण्यातील खेड तालुक्यातील प्लायवूड गोदामाला आग
पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एका प्लायवूड गोदामाला आग लागली
आगीमध्ये प्लायवूड जळून खाक झाले
आयपीएल 2025 चं वेळापत्रक जाहीर
आयपीएलचा हंगाम 23 मार्च ते 20 एप्रिल दरम्यान खेळवला जाणार
पहिला सामना 23 मार्च रोजी KKR विरुद्ध RCB
शिवसेना ठाकरे गटाचे डॅमेज कंट्रोल, राजापूर तालुक्यातील पदाधिकाऱ्यांची आज बैठक
राजन साळवी यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर ठाकरे गटाचे डॅमेज कंट्रोल
राजापुर तालुक्यातील पदाधिकाऱ्यांची आज शिवसेना भवनात पाच वाजता बैठक
ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत बैठकीला उपस्थित राहणार
नागपूरच्या डोर्ली गावात दारुगोळा कंपनीत स्फोट
नागपूर जवळील डोर्ली गावातील दारुगोळा कंपनीत स्फोट
स्फोट झाला तेव्हा अनेक कामगार कंपनीत असल्याची प्राथमिक माहिती
शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी घेतली अजित पवारांची भेट
बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी जुन्नर बाजार समितीत अजित पवारांची भेट घेतली
क्षीरसागर भेटीच्या प्रश्नावरुन अजित पवार पत्रकारांवर संतापले
बीडमधील पाणी प्रश्नावरुन संदीप क्षीरसागर यांनी अजित पवारांची भेट घेतली
आरोपी कृष्णा आंधळेचे बँक खाते जप्त
बीडंमधील संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळेची बँक खाती जप्त
कृष्णा आंधळेच्या नावावर 5 वाहने
धारुर आणि केजमध्ये बँक खाते
दिल्ली चेंगराचेंगरीत 100 हून अधिक लोकांचा मृत्यू – संजय राऊत
नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीत फक्त 18 नाही तर 100 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे, असा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
सरकार मृतांचा आकडा का लपवत आहे, असा सवाल त्यांनी केला आहे.
महाकुंभमध्ये 7000 हून अधिक लोक बेपत्ता आहे. तिथल्या चेंगराचेंगरीत ते मेले आहेत, असाही आरोप राऊतांनी केला.
कोल्हापुरात जीबीएसने दुसरा मृत्यू; 64 वर्षीय रुग्णाचा मृत्यू
कोल्हापुरात जीबीएस सिंड्रोम रुग्णाचा दुसरा बळी गेला आहे. दोनेवाडीमधील 64 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. जीबीएस सिंड्रोमचा गेल्या तीन दिवसातील दुसरा बळी आहे. त्यामुळे कोल्हापूरकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे.
मुंबईत तिन्ही मार्गांवर आज मेगा ब्लॉक
मुंबई लोकलवर आज मेगाब्लॉक आहे. हार्बर, मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गांवर दुरुस्ती व देखभालीसाठी हा ब्लॉक घेण्यात आला आहे. मध्य रेल्वेवर सीएसएमटी ते विद्याविहार दरम्यान, हार्बरवर कुर्ला ते वाशी दरम्यान, आणि पश्चिम रेल्वेवर बोरिवली ते गोरेगाव दरम्यान ब्लॉक आहे. यामुळे अनेक लोकल गाड्या रद्द किंवा वळवण्यात येत आहेत.