घरताज्या घडामोडीNag Panchami 2020: या दिवशी म्हणून करतात नागाची पूजा आणि उपवास!

Nag Panchami 2020: या दिवशी म्हणून करतात नागाची पूजा आणि उपवास!

Subscribe

श्रावण महिना सुरु झाला की,  श्रावणात येणारा पहिला सण म्हणजे नागपंचमी (Nag Panchami). यंदा २५ जुलैला शनिवारी नागपंचमी आहे. भगवान शंकराला श्रावण मासातील आराध्य दैवत मानले जाते. त्यामुळे या भगवान शंकराच्या गळ्याभोवती विराजमान असलेल्या नागालाही तितकेच विशेष महत्त दिले जाते. म्हणूनच नागपंचमीला नागाची पूजा विशेष मानली जाते. श्रावण महिना हा पावसाचा म्हणजेच वर्षा ऋतू असतो. ज्यामुळे भूगर्भातील नाग बाहेर भूतलावर येतात. त्यामुळे भूतलावरच्या लोकांना त्यांचा त्रास होऊ नये म्हणून नागदेवतेला प्रसन्न करण्यासाठी नागपंचमी ची पूजा केली जाते. श्रावणात नवविवाहित मुली आपल्या माहेरी जाण्याची प्रथा आहे. या दिवशी नवविवाहित तसेच विवाहित स्त्रिया साजश्रृंगार आणि रत्नजडित अलंकार परिधान करतात व मनोभावे नागाची पूजा करतात. नागपंचमीच्या दिवशी स्त्रिया आपल्या भावासाठी नागपंचमीचा उपवास करतात.

नागपंचमी

नागपंचमीला उपवासाचे महत्त्व

सत्येश्‍वराचा मृत्यू नागपंचमीच्या आदल्या दिवशी झाला. त्यामुळे भावाच्या शोकात सत्येश्‍वरीने अन्न ग्रहण केले नाही. त्यामुळे त्या दिवशी स्त्रिया भावाच्या नावाने उपवास करतात. ‘भावाला चिरंतन आयुष्य आणि अनेक आयुधांची प्राप्ती होवो आणि तो प्रत्येक दुःख आणि संकट यांतून तारला जावो’, हेही उपवास करण्यामागे एक कारण आहे.

- Advertisement -

नागपंचमीचा शुभमुहूर्त

२५ जुलैला नागपंचमी सकाळी ५. ४३ ते ८.२५ पर्यंत नागाची पूजा करू शकतात.

नागपंचमीला कशी करावी पूजा:

नागाच्या पूजेसाठी नागाचा मातीपासून बनवलेला नाग किंवा धातूपासून बनवलेल्या नागाची पूजा केली जाते. त्याला दूध-लाह्यांचा नैवेद्य दाखवला जातो. तसेच काही गव्हाची खीरीचा देखील नैवेद्य दाखवतात.

- Advertisement -

या गोष्टी टाळाव्यात

नागपंचमीला शेतात नांगरत नाही किंवा खणत देखील नाही. नागपंचमीच्या दिवशी धातूचा तवा देखील वापरत नाही. घरात चिरणे,कापणे अशा गोष्टी केल्या जात नाही. तसेच या दिवशी चुलीवर, गॅसवर काही तळणेही वर्ज्य असते.


हे ही वाचा – श्रावण महिना २०२० : श्रावण महिन्यातील खास व्रतांबद्दल जाणून घ्या!


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -