घरक्राइमनागालँडच्या एअरहोस्टेसचा ICUमध्ये आइसक्रीम खाऊन मृत्यू

नागालँडच्या एअरहोस्टेसचा ICUमध्ये आइसक्रीम खाऊन मृत्यू

Subscribe

मावशी आणि भाच्याच्या या संशयास्पद मृत्यूमुळे दोघांच्या मृत्यूची चौकशी करण्याची मागणी

दिल्ली जवळील गुरुग्राम येथीस नागालँडमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका एअरहोस्टेसचा आइसस्क्रीम खाऊन मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे सर्वांचीच झोप उडाली आहे. रोझी संगमा असे २९ वर्षीय एअरहोस्टेसचे नाव आहे. ती नागालँडमधील दीमापूर येते आपल्या बहिणीच्या मुलागा सॅम्युअल सोबत राहत होती. २३ जूनला तिची प्रकृती बिघडल्याने तिला ICUमध्ये दाखल करण्यात आले. उपचारांनंतर ती बरी झाली असता तिला आइसक्रीम खाण्यास दिले. मात्र आइसक्रीम खाल्ल्यानंतर तिचा मृत्यू झाला. (Nagaland airhostess dies after eating ice cream in ICU)  त्यानंतर त्याच दिवशी तिच्या बहिणीचा मुलगा सॅम्युअल हा राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या अवस्थेत आढवून आला. दोघांच्याही संशयास्पद मृत्यूमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.


२३ जून रोजी एअरहोस्टेस रोझी संगमा हिच्या पायाला दुखापत झाली. त्यानंतर संध्याकाळी ६ वाजताच्या दरम्यान सॅम्युअलने तिला तात्काळ रुग्णालयात दाखल केले. तिच्या पायांना गंभीर दुखापत झाली होती. त्याचप्रमाणे प्रचंड रक्तस्राव होत असल्याने तिला गुरुग्राम सेक्टर १० मध्ये एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. ICUमध्ये उपचार घेतल्यानंतर ती बरी झाली. बाजूच्या रुग्णाला आइसक्रीम देताना पाहून तिला देखील आइसक्रीम खाण्याची इच्छा झाल्याने सॅम्युअलने तिला आइसक्रीम खाऊ घातले. त्यानंतर तिची प्रकृती खालावली आणि मृत्यू झाला. त्यानंतर २४ तासांच्या आत सॅम्युअलने आत्महत्या केली. मात्र आत्महत्येपूर्वी त्याने एक व्हिडिओ तयार करुन त्यात रुग्णालयाकडून मला मारहाण करुन बाहेर काढण्यात आल्याचे म्हटले.

- Advertisement -

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सॅम्सुअल सोबत कोणत्याही प्रकारची मारहाण झाली नसून व्हिडिओ काढताना थोडी धक्काबुक्की झाल्याचे रुग्णालयाकडून सांगण्यात आले. त्यानंतर पुढे काय झाले याबाबत काही माहिती नसल्याचे रुग्णालयाने सांगितले आहे. मावशी आणि भाच्याच्या या संशयास्पद मृत्यूमुळे दोघांच्या मृत्यूची चौकशी करण्याची मागणी केली जात आहे. मेघालयचे मुख्यमंत्री कॉनराड संगमा यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल,असे आश्वासन दिले आहे.


हेही वाचा – ज्या दिवशी Amazon सुरू केले, त्याच दिवशी Jeff Bezos यांनी CEO पद सोडणार, जाणून घ्या आतापर्यंतचा प्रवास

- Advertisement -

 

 

 

 

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -