घरताज्या घडामोडीतळोजा मेट्रो स्टेशन: वामनबाबांच्या नावासाठी शिवसेना सल्लागार बबन पाटील आग्रही 

तळोजा मेट्रो स्टेशन: वामनबाबांच्या नावासाठी शिवसेना सल्लागार बबन पाटील आग्रही 

Subscribe

त्यांच्यामुळे रायगड आणि ठाणे परिसरात वारकरी संप्रदाय वाढविण्याचे फार मोलाचे काम केले

तळोजा मेट्रो स्टेशनला सदगुरू वामनबाबा महाराज यांचे नाव देण्याची मागणी शिवसेना रायगड जिल्हा सल्लागार बबनदादा पाटील यांनी सिडकोकडे केली आहे. याबाबत सिडकोचे एमडी संजय मुखर्जी यांची शिवसेना रायगड जिल्हा सल्लागार बबनदादा पाटील यांनी भेट घेऊन तळोजा मजकूर मठात सद्गुरू वामनबाबा महाराज यांनी अनेक वर्षे तपश्चर्या केली. त्यांच्यामुळे रायगड आणि ठाणे परिसरात वारकरी संप्रदाय वाढविण्याचे फार मोलाचे काम केले असल्याचे बबन पाटील यांनी स्पष्ट केले आहे. रायगड आणि ठाणे जिल्हयाचे तळोजा मजकूर हे वारकरी संप्रदायाचे एक शक्तिपीठ बनले आहे. त्यांनी समाज प्रबोधनासाठी फार मोठे योगदान दिलेले आहे. यापूर्वीही या भागातील ग्रामस्थांनी सिडकोकडे निवेदन दिले आहे. लवकरच मेट्रो काही महिन्यांत सुरू होते असे समजले आहे. तरी तळोजा मेट्रो स्टेशनला सदगुरू वामनबाबा महाराजांचे नाव द्यावे अशी मागणी बबन पाटील केली आहे.


हे ही वाचा – आरक्षणाची मर्यादा वाढवून देण्याची मागणी

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -