मी राजकारणात येतो, तुम्ही अभिनय क्षेत्रात या; नानांची मुश्रीफांना ऑफर

हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) आणि नाना पाटेकर यांची झालेली आजची भेट ही चर्चेचा विषय ठरली आहे. 

सिने अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) आपल्या दिलखुलास व्यक्तीमत्त्वासाठी प्रसिद्ध आहेत. मराठी, हिंदी चित्रपटांमध्ये त्यांनी कामं केली आहेत. तसेच, राज्यातील राजकारणावरही त्यांचं बारीक लक्ष असतं. ते आपली राजकीय भूमिकाही मांडत असतात. त्यातच, हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) आणि नाना पाटेकर यांची झालेली आजची भेट ही चर्चेचा विषय ठरली आहे.

कोल्हापूरच्या कागल येथे चार महापुरुषांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. यावेळी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ आणि नाना पाटेकर उपस्थित होते. तिथल्याच जवळच्या एका हॉटेलमध्ये नाना पाटेकर यांचा मुक्काम होता. हसन मुश्रीफ यांना याबाबतची माहिती समजताच ते स्वतः नाना पाटेकर यांच्याकडे पोहोचले. त्यांना पाहताच नाना पाटेकर यांनी हसन मुश्रीफ यांना ऐकेरी नावाने हाक मारत त्यांची गळाभेट घेतली.

गळाभेटीदरम्यान नाना म्हणाले, ‘अरे तू इकडे कशाला आलास? मीच तुला भेटण्यासाठी तुझ्याकडे येणार होतो’. त्यावर उत्तर देताना मुश्रीफ म्हणाले, ‘असं कसं? पाहुण्यांचे स्वागत, आदरातिथ्य करणं हे आम्हा कोल्हापूरकरांचे संस्कार आहेत’.

 

View this post on Instagram

 

A post shared by Hasan Mushrif (@hasanmushrif)

“हसन हा माझा जवळचा दोस्त आहे रे. उगाच गैरसमज करून घेऊ नका. काही दिवसांपूर्वी मुंबईत रस्त्याने जात असलेला हसन मला दिसला. मी ‘हसन..हसन असे म्हणत निघालो. या घाईत मी माझी गाडी दुसऱ्याला धडकली होती”, असा एक किस्साही नानांनी सांगितला.


कोल्हापुरातील कागल येथे महात्मा फुले, अण्णाभाऊ साठे, डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि महत्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.

यावेळी भाषणादरम्यान नाना म्हणाले, फक्त महापुरुषांचे पुतळे उभारून चालणार नाही. त्यांच्या विचाराने जाण्याची गरज आहे. गेल्या २५ वर्षांपासून मुश्रीफ निवडून येतात ही साधी गोष्ट नाही. पुढच्या निवडणुकीत ते उभे आहेत असे म्हटलं तर लोक निवडून देतील. पण सत्ताधाऱ्यांनी आमच्यासारख्या सामान्य जनतेचे प्रश्न सोडवावेत, असेही नाना पाटेकर म्हणाले. इतक्यावरच न थांबता नाना पाटेकर यांनी मुश्रीफ यांना थेट अभिनय क्षेत्रात येण्यासाठी ऑफर दिली. तुम्ही अभिनय क्षेत्रात या, मी राजकारणात येतो.”