पर्यटनाच्या नकाशात नांदगाव झळकविणार – खा. सुनील तटकरे

After Marine Highway in Shrivardhan, tourism will get more boost - Sunil Tatkare
श्रीवर्धनमध्ये सागरी महामार्गानंतर पर्यटनाला अधिक चालना मिळेल - सुनील तटकरे

नांदगावाला नैसर्गिक सौंदर्यासह ऐतिहासिक वारसाही लाभला असून, शांत आणि नीरव समुद्र किनारा पर्यटकांसाठी सुरक्षित आहे. पुरातन मंदिरांसह श्रीवर्धनच्या धर्तीवर येथील चौपाटीचा विकास करायचा आहेच, पण ग्रामस्थांनी गावच्या विकासाचा आराखडा तयार करावा, त्यानुसार विकास करून पर्यटनाच्या नकाशात गावाचे नाव झळकविणार असल्याचे प्रतिपादन खासदार सुनील तटकरे यांनी केले.

येथे श्री क्षेत्र वाघोबा देवस्थान निवारा शेड आणि रस्त्याचे भूमिपूजन समारंभात ते बोलत होते. तटकरे पुढे म्हणाले, गावाच्या विकासासाठी ग्रामस्थांनी एकत्र येणे असते. येथील सर्वधर्मसमभावाची जपणूकही महत्त्वाची आहे. ईश्वराप्रती श्रद्धा आणि निष्ठा असल्यास यश हमखास मिळते म्हणूनच स्थानिक कोळी समाज वाघोबा देवस्थानाचा कौल घेतल्याखेरीज मच्छीमारीस जात नसल्याचा आवर्जून उल्लेख त्यांनी केला. रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपाध्यक्षा स्मिता खेडेकर यांनी प्रास्ताविक केले. अगामी काळात तटकरे विकासाची गंगा येथे आणतील, असा विश्वास व्यक्त केला. तर देवस्थानालगतची जमीन दान देणार्‍या मुबिन सोंडे आणि रफतशेठ यांचा सत्कार तटकरे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी अ‍ॅड. इस्माईल घोले, सरपंच वैशाली पवार, उपसरपंच अस्लम हलडे, भाई सुर्वे, जितेंद्र दिवेकर, रवींद्रनाथ खेडेकर, जमीर बकवाल, जितेंद्र सुर्वे, योगेश पाटील, ग्रामपंचायत सदस्य, कोळी समाज अध्यक्ष आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उदय खोत यांनी केले.


हे ही वाचा – विनोद तावडेंची भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदी नियुक्ती, तावडे पुन्हा मुख्य प्रवाहात