घरताज्या घडामोडीनवी मुंबईत विमानतळाच्या नामांतरावरुन आज 'सिडको'वर आंदोलन, पोलिसांचा कडक बंदोबस्त तर वाहतूक...

नवी मुंबईत विमानतळाच्या नामांतरावरुन आज ‘सिडको’वर आंदोलन, पोलिसांचा कडक बंदोबस्त तर वाहतूक मार्गात बदल

Subscribe

कोपरखैरणे ते बेलापूर , खारघर ते बेलापूर, नेरुळ ते बेलापूर हे अंतर्गत मार्ग पूर्णपणे बंद

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला ( New Mumbai International airport) दि.बा. पाटील (Di ba Patil) यांचे नाव देण्यात यावे या मागणीसाठी आज सिडकोवर घेराव आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोनलासाठी नवी मुंबईमध्ये पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. भाजप आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वात आज नवी मुंबईत हे घेराव आंदोलन होणार आहे. या मोर्चाला कोणतीही परवानगी देण्यात आलेली नाही. मात्र मोठ्या संख्येने लोक या आंदोलनात सहभागी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मुंबई,ठाणे,वाशी,उरण, भिवंडी,कल्याण,डोंबिवलीतील आगरी कोळी समाज बांधव आजच्या आंदोलनात सहभागी होणार आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्थेसाठी वाहतूक मार्गात महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. गुरुवारी सकाळी ८ ते संध्याकाळी ८ वाजेपर्यंत सायन पनवेल महामार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. नवी मुंबई परिसरातील वाहतूक देखील पर्यायी मार्गांनी वळवण्यात आली आहे. त्याचप्रमाणे नवी मुंबईत आज जड वाहनांना जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. आंदोलनात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा प्रयत्न असणार आहे.( Navi Mumbai airport renaming agitation on CIDCO tight police security and traffic route change)

या महामोर्चाच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीत महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. मुख्य आंदोलनस्थळी वाहनांची तपासणी केली जात आहे. कोपरखैरणे ते बेलापूर , खारघर ते बेलापूर, नेरुळ ते बेलापूर हे अंतर्गत मार्ग पूर्णपणे बंद असणार आहेत. तर मुंबईकडून येणारी वाहतूक महापे शिळपाटामार्गावरुन पुण्याकडे वळवण्यात आली आहे. तर पुण्याहून येणारी वाहने तळोजा,मुंब्रा,महापोमार्गे मुंबईच्या दिशेने जाणार आहेत. उरण फाटा ते खारघर दरम्यानचा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.

- Advertisement -

घेराव आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई पोलिसांनी जोरदार तयारी केली आहे. या आंदोलनात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी नवी मुंबई, पनवेलमध्ये ५ हजार पोलीस अधिकारी आणि कर्मचारी दाखल झाले आहेत. त्याचप्रमाणे मुंबई,ठाणे,पालघर,नाशिक आणि नाशिकहून देखील पोलीस दाखल झाले आहेत. राज्य राखीव दलाच्या ७ तुकड्या सध्या नवी मुंबईत तैनात करण्यात आल्या आहेत. मोठ्या संख्येने आंदोनलकर्ते या नवी मुंबईत दाखल होणार आहेत त्यामुळे हे आंदोलन हाताळण्यासाठी ५०० पर्यंत वरिष्ठ अधिकारी सक्रीय झाले आहेत.

बेलापूरमधील सिडको भवन परिसरात पोलिसांचा कडेकोड बंदोबस्त करण्यात आला. महापेकडून येणाऱ्या रस्त्यावरही बंदोबस्त तैनात करण्यात आलाय.त्याचप्रमाणे पनवेलमध्ये वाहनांची कसून चौकशी केली जात आहे. कल्याण दुर्गाजडी,कटई नाका, खडगोलवली, कल्याण,उल्हासनगर,अंबरनाथमध्ये नाकाबंदी करण्यात आली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – मुख्यमंत्री ठाकरेंना अंधारात ठेऊन जितेंद्र आव्हाड-देवेंद्र फडणवीस गुप्त भेट; चर्चेला उधाण

 

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -