लसीच्या एका मात्रेतील रेल्वे प्रवासाच्या शक्यतेने पनवेलकरांसह नवी मुंबईकर सुखावले

नवी मुंबईला उद्योग हब म्हटले जाते.

Navi Mumbaikars along with Panvelkars were relieved by the possibility of a one-dose train journey

कोरोना प्रतिबंधक लशीची एक मात्रा घेतलेल्या नागरिकांना रेल्वे प्रवासास मुभा देण्याच्या राज्य सरकारच्या सुरू असलेल्या प्रयत्नांचे पनवेलसह नवी मुंबइकरांमध्ये समाधान व्यक्त होतो आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी लसीच्या एका मात्रेनंतर रेल्वे प्रवासाची मुभा देण्याचे सुतोवाच केले आहे. आरोग्य मंत्र्यांच्या या प्रयत्नावर पनवेलकरांनी समधान व्यक्त करत रोजगाराच्या अडचणी सोडवण्याच्या प्रयत्नाचे आम्ही स्वागत करतो, असे रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र घरत यांनी म्हटले आहे.

राज्यात कोरोना संकटातून महाराष्ट्र बाहेर येत असल्याच्या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी रेल्वेबरोबरच मॉलमध्ये प्रवेश देण्याविषयी विचार करण्यात येत असल्याचे सुतोवाच केले आहे. दिवाळीनंतरच्या रुग्णसंख्येचा विचार करून रेल्वे प्रवासाची मुभा देण्याचे संकेत आरोग्य मंत्र्यांनी दिले होते. आरोग्य मंत्र्यांच्या या सुतोवाचानंतर पनवेलमध्ये स्वागत करण्यात आले. पनवेलसह नवी मुंबईतील हर्बर आणि ट्रान्सहर्बरवर मोठ्या संख्येने प्रवासी रेल्वेने प्रयत्न करतात. कोरोनाच्या संकटात रेल्वे प्रवासाला सामान्य प्रवाशांना प्रतिबंध घालण्यात आला होता.

यामुळे मोठ्या संख्येने लोकांना रोजगाराला मुकावे लागले होते. नवी मुंबईला उद्योग हब म्हटले जाते. या शहरासह पनवेलहून मुंबईकडे जा-ये करणार्‍यांची संख्या मोठी आहे. मात्र प्रतिबंधामुळे त्यांच्या रोजगाराचा बिकट प्रश्न बनला होता. आता नव्याने रेल्वे प्रवासात मुभा मिळण्याची शक्यता लक्षात आल्यामुळे या परिसरात रेल्वे प्रवास करणार्‍या सामान्य कामगारांनी या प्रयत्नांचे स्वागत होऊ लागले आहे. नवी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते नामदेव भगत तसेच सेनेचे मनोहर मढवी यांनी स्वागत करताना सरकारच्या या प्रयत्नामुळे बेरोजगारांना पुन्हा रोजगाराची संधी मिळेल, असा विश्वास केला. पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांनी सरकारच्या सुतोवाचाने तरुणांची रोजगाराची संधी पुन्हा त्यांना मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. यासाठीआवश्यक असलेल्या बाबींची पूर्तता रेल्वे आणि पालिकेने करावी, अशी सूचनाही त्यांनी ‘महानगर’शी बोलताना केली.


हे ही वाचा – आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिली महत्वपूर्ण माहिती