Cruise drug case: लाखो रूपयांचे MDM ड्रग्स जप्त, NCB कडून आणखी दोघांना अटक

NCB arrest

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (NCB) ने सोमवारी रात्री उशिरा आणखी दोघांना अटक केली आहे. या प्रकरणात आणखी एक पेडलर आणि एक क्रूझवरील प्रवासी एनसीबीच्या अटकेत आला आहे. या कारवाईदरम्यान पेडलरकडे 5 लाख रुपयांच एमडीएमए ड्रग्स जप्त करण्यात आले आहे. एनसीबीने या प्रकरणात आतापर्यंत ९ आरोपींना अटक केली आहे. याआधीच श्रेयस नायरला कोर्टाने अटक केली आहे. या क्रूझवरील पार्टीत आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेट्सच्या लिंक्स आढळल्याचे एनसीबीने कोर्टाकडे मांडलेल्या बाजुत म्हटले आहे. या संपुर्ण प्रकरणात अटक झालेल्यांची संख्या आता ११ झाली आहे.

आतापर्यंत कोणाला एनसीबीकडून अटक ?

आयर्न खान, मूनमून धामेचा, अरबाज मर्चंट, नुपूर सतिजा,इस्मित चड्डडा, मोहक जैस्वाल, गोमित चोप्रा, विक्रांत चोकर, श्रेयस नायर अशा अकरा जणांना या प्रकरणात अटक झाली आहे. या प्रकरणातील कारवाईत एनसीबीकडून आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता आहे.

कारवाईत काय सापडले ?

क्रूझवरील सकाळी ताब्यात घेण्यात आलेल्या प्रवाशाकडे हायड्रोफ्लोविक विड सापडल्याने त्यालाही एनसीबीकडून अटक करण्यात आली आहे. एनसीबीच्या ऑपरेशन कार्डिलिया प्रकरणात अटक करण्यात आरोपींची संख्या वाढताना दिसतेय.

बॉलिवुड अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानला मुंबईच्या किला कोर्टाने येत्या ७ ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेटच्या लिंक्स आढळून आल्यानेच आम्हाला आर्यनच्या चौकशीसाठी त्याची कोठडी हवा असल्याचा युक्तीवाद नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) च्या वतीने करण्यात आला. आर्यनसह मुनमुन आणि अरबाज यांनाही सोमवारी कोर्टात दाखल करण्यात आले होते. या दोघांनाही ७ ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडी सुनावण्यात आली आहे. कार्डेलिया क्रूझवर एनसीबीने टाकलेल्या धाडीनंतर एनसीबीने कोर्टाकडे कस्टडीची मागणी केली होती.

आर्यन खानच्या वॉट्स चॅटवरून झाला युक्तीवाद

संपुर्ण प्रकरणात अनेक संशयित आरोपी आहेत ज्यांची अजून ओळख पटवयाची आहे त्यासाठी चौकशी गरजेची आहे. आर्यन खान हा पेमेंट करण्यासाठी कश्याच्या माध्यमातून करायचं हे विचारताना दिसतोय. तसेच संपुर्ण संभाषणात बऱ्याच कोडवर्डचा वापर यात करण्यात आला आहे. आम्ही आरोपींच्या चौकशीदरम्यान जुहूमधील 9 व्या आरोपीला अटक केली. त्याच्याकडून मोठ्या प्रमाणात ड्रग्स जप्त केले, अशीही माहिती एनसीबीने कोर्टात दिली.

एनसीबीचे अधिकारी दोघांना तपासायला आले एकाकडे काहीही सापडलं नाही, असा युक्तीवाद आर्यनचे वकील मानेशिंदे यांनी केला. दुसऱ्याकडे 5 ग्रॅम चरस सापडलं आणि तरीही ते सेवन करण्यासाठीच आणलंय अस अधिकारी म्हणतायत, असेही त्यांनी कोर्टाला सांगितले. बाकीच्या ड्रग्स जप्तीकरणाशी माझा काहीही संबंध नाही, असाही युक्तीवाद यावेळी करण्यात आला. व्हॉट्स एप चॅट माझ्या कस्टडीसाठी पुरेसे नाहीत. माझ्याकडे काही सापडलं आहे का ? किंवा इतर गोष्टींचाही विचार करावा, असेही म्हणणे मानेशिंदे यांनी मांडले.


हेही वाचा – NCB raid on Mumbai cruise : आर्यन खानला ७ ऑक्टोबरपर्यंत NCB कस्टडी