घरताज्या घडामोडीखालापुरात अपघातांचं प्रमाण वाढलं; उपचारासाठी ट्रॉमा सेंटरची मागणी

खालापुरात अपघातांचं प्रमाण वाढलं; उपचारासाठी ट्रॉमा सेंटरची मागणी

Subscribe

सुविधा उपलब्ध झाली तर अपघातानंतर तातडीची मदत मिळून जखमींना दिलास मिळेल.

मुंबई-पुणे यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर खालापूर हद्दीत मागील ८ वर्षांत छोट्या-मोठ्या अपघातांनी ओलांडलेला हजाराचा टप्पा पाहता येथे ट्रामा सेंटर अत्यंत गरजेचे झाले असून, तशी सुविधा उपलब्ध झाली तर अपघातानंतर तातडीची मदत मिळून जखमींना दिलास मिळेल. द्रुतगती मार्गावर नुकतेच पुणे जिल्ह्यातील उर्सेनजीक ट्रामा केअर सेंटर सुरू करण्यात आले. परंतु खालापूर हद्दीतील अपघातांची संख्या पाहता टोल नाक्यानजीक सुसज्ज ट्रामा केअर सेंटर उभे राहाणे गरजेचे आहे जेणेकरून अपघात घडल्यास केवळ १० मिनिटांत जखमीवर उपचार सुरू होतील. ब्रिटीश काळात बांधण्यात आलेल्या मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील अपघात कमी व्हावेत आणि जलद प्रवास करता यावा यासाठी युतीच्या राजवटीत द्रुतगती मार्ग बांधण्यात आला. अवघड आणि कायम वाहतूक कोंडी असलेल्या बोरघाटाची कटकट ६ पदरी द्रुतगतीने संपवली खरी, परंतु वेग मर्यादा ताशी ८० किलोमीटर असताना देखील अधिकचा वेग आणि लेन शिस्तीचे पालन होत नसल्यामुळे दिवसाआड एक अपघात होत आहे.

या हद्दीतील आकडेवारी चिंताजनक आहे. अपघात झाल्यानंतर आयआरबीचा डेल्टा फोर्स, देवदूत पथक, वाहतूक पोलीस, तसेच अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था मदतीसाठी धावून जाते. गंभीर जखमींना पुणे, तसेच नवी मुंबई येथे उपचारासाठी हलविण्यात येते. परिसरात २० किलोमीटर अंतरात गंभीर जखमीवर आवश्यक उपचार होतील, असे रुग्णालय नसल्याने जखमीना तातडीने उपचारासाठी लांबचा पल्ला गाठावा लागतो. येथील ट्रामा केअर सेंटरचा प्रश्न गेले अनेक वर्षे प्रलंबित आहे. याशिवाय मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर असे ट्रामा केअर सेंटर वरदान ठरेल.

- Advertisement -

अपघात झाल्यानंतर आयआरबी डेल्टा फोर्स, देवदूत पथक, वाहतूक पोलीस यांच्यासह अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था मदतीसाठी धावून जाते. गंभीर जखमींना पुणे, तसेच नवी मुंबई येथे उपचारासाठी हलविण्यात येते. खालापूर परिसरात २० किलोमीटर अंतरात गंभीर जखमींवर आवश्यक उपचार होतील असे रुग्णालय नसल्याने जखमींना तातडीने उपचारासाठी लांबचा पल्ला गाठावा लागतो. नवी, मुंबई, मुंबईत रुग्णालय व्यवस्थापन देखील जखमीचे नातेवाईक सोबत नसल्याने अडवणूक करीत असल्याचा वाईट अनुभव रुग्णवाहिका चालकाला वारंवार येतो. त्यामुळे ज्या प्रमाणे टोल आकारला जातो त्या प्रमाणेच आरोग्य सोयी आवश्यक आहेत.

८ वर्षांतील अपघात (खालापूर हद्द)

सन २०१३ – अपघात १९८
मृत्यू-४९, जखमी ९१
२०१४ – २११
मृत्यू ५३, जखमी ९६
२०१५ – २०३
मृत्यू ६३, जखमी ४५
२०१६ – १३१
मृत्यू ३८, जखमी ७०
२०१७ – १६८
मृत्यू ४३, जखमी ९७
२०१८ – १९२
मृत्यू ३६, जखमी ७८
सप्टेंबर २०१९ – १६१
मृत्यू २९, जखमी ५४
जानेवारी ते ऑक्टोबर २०२० पर्यंत १३७ अपघात
मृत्यू ८, जखमी ३०

- Advertisement -

कोरोना संसर्गात लॉकडाऊनमुळे मार्च ते मे शून्य अपघात होते. त्यानंतर अपघात वाढले.
२०२१ वर्षांत सप्टेंबर पर्यंत
२५ मृत्यू आणि ४५ जखमी

२८ मे २०१२ रोजी खालापूरनजीक धामणी गावाजवळ लग्नाच्या वर्‍हाडाला झालेला भीषण अपघात आजपर्यंतचा सर्वात मोठा अपघात असून, त्यात २७ जणांचा बळी गेला होता. त्यानंतर खालापूरनजीक ट्रामा केअर सेंटर, कंटेनरसाठी यार्ड यासाठी मोठी आश्वासने देण्यात आली. मात्र या फुकाच्या आश्वासनांमुळे पुढे काही घडणे शक्यच नव्हते.


हे ही वाचा – १५०० कोटींचा घोटाळा हा सोमय्यांचा जावईशोध, हसन मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -