Monday, February 15, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी नवी मुंबईतील पोलिस निरीक्षकांची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या

नवी मुंबईतील पोलिस निरीक्षकांची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या

Related Story

- Advertisement -

नवी मुंबईतील एपीएमसी पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण पवार यांनी आज सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास एपीएमसी पोलीस ठाण्यातच आपल्या सर्व्हिस पिस्तुलातून स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलीस अधिकारी भूषण पवार हे एपीएमसी पोलीस ठाण्यामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक या पदावर कार्यरत होते. सुमारे ४० वर्ष वयोगटातील तरुण अधिकारी होते.

मागील अनेक दिवसांपासून भूषण पवार हे रजेवर होते आणि आज ते कामावर रुजू झाले. एपीएमसी पोलीस ठाण्याच्या डिटेक्शन रूममध्ये ते बसत होते. यावेळी आपल्या केबिनमध्ये ते एकटेच बसले होते. त्यानंतर आतून गोळी झाडल्याचा आवाज आल्यानंतर इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांच्या केबिनकडे धाव घेतली असता भूषण पवार यांनी स्वतःवर गोळी झाडल्याचे निदर्शनास आले. त्यांना तात्काळ वाशी एमजीएम हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या आत्महत्येचे कारण अजून स्पष्ट झाले नसले तरी मागील काही दिवसांपासून ते तणावात वावरत असल्याचे त्यांच्या एकंदरीत वागण्यावरून दिसत असल्याचे पोलीस उपायुक्त शिवराज पाटील यांनी सांगितले.


- Advertisement -

हेही वाचा – वाशीतील जलकुंभ भूमीपूजनावरून राजकारण पेटले


 

- Advertisement -