घरक्राइमहिरेन प्रकरणात आणखी एका अधिकाऱ्याला होणार अटक?

हिरेन प्रकरणात आणखी एका अधिकाऱ्याला होणार अटक?

Subscribe

मनसुख हिरेन प्रकरणी अजून एका अधिकाऱ्याला अटक होण्याची शक्यता आहे. 

गेल्या काही दिवसांपासून सचिन वाझे आणि मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण चांगलेच गाजत आहे. यामध्ये सचिन वाझे यांचे अनेक कारणामे उघडकीस आले असून या प्रकरणात आतापर्यंत दोघांना अटक करण्यात आली आहे. एटीएसने दोन जणांना अटक केली असून यामध्ये निलंबित पोलीस कॉन्स्टेबल आणि एका बुकीचा समावेश आहे. निलंबित पोलीस कॉन्स्टेबल विनायक शिंदे आणि क्रिकेट बुकी नरेश गोर असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर आता अजून एकाला अटक होण्याची शक्यता आहे. एनआयएचे नवे आयाजी ज्ञानेद्र वर्मा आणि एसपी विक्रम खलाटे हे मनसुख हिरेन यांच्या ठाण्यातील घरी पोहोचले आहेत. दरम्यान, हिरेन यांच्या कुटुंबियाशी एनआयएचे अधिकारी संवाद साधणार आहेत. त्यामुळे या प्रकरणी अजून एका अधिकाऱ्याला अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकांनी भरलेल्या गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह ५ मार्चला सापडला होता. मनसुख हिरेन यांच्या मृत्यूचे गूढ अद्यापही कायम आहे. त्यांनी आत्महत्या केली की त्यांच्यासोबत घातपात झाला, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मनसुख हिरेन यांची हत्या झाल्याचा दावा त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. दरम्यान, एनआयएच्या पथकाने या प्रकरणात मनसुख हिरेन यांच्या कुटुंबियांचे जबाब नोंदवून घेतल्यानंतर तपासाच्या मुळात हात घालण्यास सुरुवात केली आहे. या प्रकरणाचा सर्वप्रथम तपास करणारे मुंबई गुन्हे शाखेच्या सीआययुचे तत्कालीन प्रभारी अधिकारी सचिन वाझे यांना चौकशीसाठी एनआयएच्या दक्षिण मुंबईतील कार्यालयात बोलावले होते. त्यानंतर या प्रकरणाचे दुसरे तपास अधिकारी सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन अलुकनुरे आणि मनसुख हिरेन संशयास्पद मृत्यू प्रकरणाचा तपास करणारे एटीएसचे सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीपाद काळे यांना चौकशीसाठी एनआयएच्या कार्यालयात बोलावण्यात आले होते. या तिन्ही अधिकार्‍यांकडे मुकेश अंबानी स्फोटक कार प्रकरणात आतापर्यंत करण्यात आलेल्या तपासाची माहिती तसेच आणि काय तपास केला याबाबत चौकशी करण्यात आली.

- Advertisement -

तर आतापर्यंत मनसुख हिरेन प्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली आहे. तर आता पुन्हा एकदा एका अधिकाऱ्याला याप्रकरणी अटक होण्याची शक्यता आहे.


हेही वाचा – मनसुख हिरेन हत्येप्रकरणी क्राईम ब्रँचच्या अधिकाऱ्याला समन्स

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -