घरताज्या घडामोडीMumbai-goa Highway : काँग्रेस-राष्ट्रवादीचं माझ्या माथी आलेलं पाप मी निस्तरतोय - नितीन...

Mumbai-goa Highway : काँग्रेस-राष्ट्रवादीचं माझ्या माथी आलेलं पाप मी निस्तरतोय – नितीन गडकरी

Subscribe

मुंबई-गोवा महामार्गाचे काम पूर्ण होणार?

मागील अकरा वर्षापासून मुंबई-गोवा महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम महामार्ग प्राधिकरण आणि ठेकेदारांच्या हलगर्जीपणामुळे रखडलेले आहे. गेल्या अकरा वर्षात सुमारे साडेतीन हजार अपघात होऊन अनेक प्रवाशांचा नाहक बळी गेला आहे. गेली ११ वर्षे रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाच्या गोंधळाविरोधात मनसे रस्ते आस्थापना विभागाचे कार्याध्यक्ष योगेश चिले यांनी मागच्या काही महिन्यांत रान उठवले होते. योगेश चिले यांनी सोशल मिडिया माध्यमातून कोकणवासियांना या विषयावर जागे केले होते. मुंबई-गोवा महामार्गाचे मुख्य अभियंता, सहाय्यक अभियंता यांच्याशी सातत्याने चर्चा करून, आंदोलने करून मनसेने या विषयावर प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता.  याच विषयावर कोकणचे सुपुत्र मनसे सरचिटणीस मनोज चव्हाण आणि रस्ते आस्थापना कार्याध्यक्ष योगेश चिले यांनी केंद्रीय मंत्री, रस्ते परिवहन व महामार्ग नितीन गडकरी यांची त्यांच्या नागपुरच्या घरी भेट घेतली.

 

- Advertisement -

अन् गडकरींनी लगावला टोला …

काँग्रेस-राष्ट्रवादीचं पाप मी निस्तरत असून माझं वैयक्तिक लक्ष आहे या महामार्गावर आहे. मी कोकणाला लवकरात लवकर चांगला रस्ता देणार हा माझा शब्द आहे म्हणूनच, महामार्गाच्या कामाची गती वाढवणार असून, ज्यांच्यामुळे हा रस्ता रखडलाय त्या दोन काँट्रॅक्टरना बदलणार असल्याचे केंद्रीय मंत्री, रस्ते परिवहन व महामार्ग नितीन गडकरी यांनी सांगितले. मनसेच्या शिष्टमंडळाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सुचनेनुसार नितीन गडकरी यांची भेट घेतली. यावर महामार्गाचा विषय मी लवकरच संपवत असल्याचे सांगत नितीन गडकरी यांनी मनसेच्या शिष्टमंडळाला आश्वासन देत निरोप घेतला. आता केंद्रीय मंत्री, रस्ते परिवहन व महामार्ग नितीन गडकरी यांच्या आश्वासनानंतर मुंबई-गोवा महामार्गाचे काम पूर्ण होणार का,याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

                                                                                             वार्ताहर – अमूलकुमार जैन

- Advertisement -

हे ही वाचा – सहकार क्षेत्र अडचणीत, आजची फडणवीस-शहा भेट महत्त्वाची – पंकजा मुंडे


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -