घरताज्या घडामोडीसुशांतची हत्या नाही, आत्महत्या! एम्स फॉरेन्सिक विभागाचे प्रमुख डॉ. सुधीर गुप्तांचा निष्कर्ष

सुशांतची हत्या नाही, आत्महत्या! एम्स फॉरेन्सिक विभागाचे प्रमुख डॉ. सुधीर गुप्तांचा निष्कर्ष

Subscribe

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येच्या 110 दिवसांनंतर मोठा खुलासा झाला आहे. या प्रकरणात सीबीआयला मदत करणार्‍या एम्सच्या पथकाने आपल्या अहवालात हत्येची शक्यता नाकारली आहे. वृत्तानुसार, एम्सच्या फॉरेन्सिक विभागाचे प्रमुख डॉ. सुधीर गुप्ता म्हणतात, ‘सुशांतचे प्रकरण क्लिअर कट आत्महत्येचे प्रकरण आहे. त्याची हत्या झाली नव्हती’. मात्र, अद्याप याची अधिकृतपणे सीबीआयने पुष्टी केलेली नाही.

सुशांतच्या शवविच्छेदन अहवालाची चौकशी करण्यासाठी 21 ऑगस्ट रोजी डॉक्टर सुधीर गुप्ता यांच्या नेतृत्वात एम्सच्या पाच डॉक्टरांची समिती तयार केली गेली. 20 सप्टेंबर रोजी हे पथक आपला अहवाल सादर करणार होते. मात्र याला 8 दिवसांचा उशीर झाला. 28 सप्टेंबर रोजी एम्सने आपला अहवाल सीबीआयकडे सोपवला. विशेष म्हणजे एम्सच्या डॉक्टरांना व्हिसेरामध्ये कोणत्याही प्रकारचे विष आढळलेले नाही.

- Advertisement -

सुशांतच्या मृतदेहाचे पोस्टमार्टम करणार्‍या मुंबईतील कूपर रुग्णालयाच्या डॉक्टरांना या अहवालात क्लीन चिट देण्यात आलेली नाही. सुशांतचे शवविच्छेदन कूपर रुग्णालयातील डॉक्टरांनी केले होते. परंतु त्यांनी दिलेल्या रिपोर्टवर प्रश्न उपस्थित झाले होते. सुशांतच्या गळ्यावर मिळालेल्या जखमांच्या अहवालात उल्लेख नव्हता. शिवाय त्याच्या मृत्यूची वेळ देखील त्यात नमूद करण्यात आलेली नव्हती. यानंतर सीबीआयने एम्स रुग्णालयाकडे पोस्टमार्टम तसेच व्हिसेरो रिपोर्टचा अभ्यास करण्याची विनंती केली होती.

सुमारे तीन महिन्यांपूर्वी मुंबई पोलिसांनीही व्हिसेरा अहवाल प्रसिद्ध केला होता. सुशांतच्या पोस्टमार्टमनंतर व्हिसेरा तपासणीसाठी कलिना फॉरेन्सिक लॅबला देण्यात आला. प्रयोगशाळेने आपल्या अहवालात मृत अभिनेत्याच्या शरीरात कोणतेही संशयित रासायनिक किंवा विष सापडले नसल्याचे स्पष्ट केले होते.

- Advertisement -

सुशांत सिंहचा 14 जून रोजी वांद्रे येथील राहत्या घरात मृतदेह आढळला होता. सुशांतने आत्महत्या केली असल्याचे मुंबई पोलिसांनी सांगितले असले तरी ही हत्या असावी, असा संशय व्यक्त केला जात आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर सीबीआय याप्रकरणी तपास करत असून आपण सर्व बाजूंची पडताळणी करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

सीबीआयने अहवाल जाहीर करावा- देशमुख

सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूचा चौकशी अहवाल सीबीआयने लवकरच सार्वजनिकपणे जाहीर करावा. जेणेकरुन हे प्रकरण आत्महत्येचे आहे की हत्येचे हे सर्वांना कळू शकेल, अशी प्रतिक्रिया अनिल देशमुख यांनी दिली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -