घरताज्या घडामोडीमुख्य रस्त्यांसह आता जोड रस्त्यांवरही नो पार्किंग झोन!

मुख्य रस्त्यांसह आता जोड रस्त्यांवरही नो पार्किंग झोन!

Subscribe

वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मुंबई महानगर पालिका आणि वाहतूक पोलीस प्रशासनाने घेतलेल्या नव्या नियमाची अंमलबजावणी केली जाणार आहे.

मुंबईकरांना शहरात सातत्याने वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते. वाहतूक नियमन नसलेल्या काही ठिकाणी वाहतूक कोंडी होताना दिसते. तसेच अवैध पार्किंगमुळेही मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होते. यावर प्रशासनामार्फत अनेक उपाय केले जातात. मात्र, त्याला अपेक्षित यश मात्र येताना दिसत नाही. या पार्श्वभूमीवर वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मुंबईच्या मुख्य रस्त्यांसह आता जोड रस्त्यांवरही यापुढे नो पार्किंग झोन असणार आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मुंबई महानगर पालिका आणि वाहतूक पोलीस प्रशासनाचा नवा नियम अंमलात आणला जाणार आहे. मुख्य रस्ते वगळता मुंबईतील जोड रस्त्यांवर नो पार्किंग झोन केले जाणार आहेत.

चार महत्वाच्या मार्गांवर नो पार्किंग झोन 

नव्या निकषांनुसार, बस स्टॉपच्या परिसरात आजूबाजूला ५० मीटरपर्यंत वाहने पार्किंग करता येणार नाहीत. यासाठी महर्षी कर्वे रोड सह चार महत्वाचे मार्ग प्रशासनाने निवडले आहेत. ते मार्ग म्हणजे एस. व्ही. रोड, गोखले मार्ग, न्यू लिंक रोड आणि एल बी एस मार्ग. या ठिकाणच्या जोड रस्त्यांना ‘नो पार्किंग झोन’ म्हणून जाहीर करण्यात आले आहे. मात्र, जर वाहनचालकांना पार्किंग करायची असेल, तर ‘पे अँड पार्क’ची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी काही जागाही आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. खास करून त्या ठिकाणच्या रहिवाश्यांना आणि ज्या ठिकाणी वाहतूक कोंडी होत नाही, अशा ठिकाणी पार्किंगची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.

- Advertisement -

अवैध पार्किंगला कडक दंड

अवैधरीत्या पार्किंग करणाऱ्यांना मोठा आर्थिक दंड केला जाणार आहे. त्यासाठीचे शुल्क साधारणत: दिवसा १५०० रुपये तर रात्री ७७० रूपयांपर्यंत असणार आहे. यासोबतच महत्वाचे म्हणजे रेल्वे स्थानकाच्या आजूबाजूला म्हणजे ज्या ठिकाणी जास्त वर्दळ असते त्या ठिकाणी गाड्या पार्क करणाऱ्यांवर यापुढे कारवाई केली जाणार आहे. तसेच, अवैध जागेत पार्किंग केली, तर कडक दंडसुद्धा आकारला जाणार आहे. यामध्ये रेल्वे स्थानकाबाहेर टॅक्सी, रिक्षांचे जरी पार्किंग दिसले तर त्यांना देखील हा दंड भरावा लागणार आहे. यामध्ये चार चाकी वाहनांसाठी १०,००० तर दुचाकी वाहनांसाठी तब्बल ५,००० दंड आकरण्यात येणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -