एका कॉलमुळे ३९ दिवसांत संसार मोडला

nurse jumped 7th floor for one blackmail call Chhattisgarh
एका कॉलमुळे ३९ दिवसांत संसार मोडला

एका कॉलमुळे ३९ दिवसांत संसार मोडल्याची घटना समोर आली आहे. एका नर्सने स्वतःच्या नवऱ्याला रुममध्ये बंद करून ७व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना छत्तीसगडमधील दुर्ग जिल्हायत घडली आहे. ३९ दिवसांपूर्वीच तिचा प्रेमविवाह झाला होता. याप्रकरणी चौकशी केल्या दरम्यान काही दिवसांपासून पीडित महिलेला एक ब्लॅकमेलिंगचा कॉल येत असल्याचे आढळून आले आहे.

नक्की काय घडले?

महिला नर्स प्रिती देवानन यांचा मृतदेह रविवारी रात्री १०.३०च्या सुमारास बिल्डिंगच्या मागच्या बाजूला आढळला. प्रितीने तिच्या नवरा महेंद्र देवाननला रुममध्ये बंद करून इमारतीच्या ७व्या मजल्यावरून उडी मारली.

गेल्याच वर्षी या दोघांची एका खासगी रुग्णालयात ओळख झाली आणि मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. मग त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. ३९ दिवसांपूर्वीच दोघांनी कोर्टात जाऊन लग्न केले होते. प्रितीच्या अशा अचानक जाण्यामुळे संपूर्ण कुटुंबाला धक्का बसला आहे. आत्महत्येचे नेमके कारण अजूनही माहित नाही आहे. सध्या याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

दरम्यान प्रितीचा नवरा डॉ. महेंद्र देवनान यांनी पोलिसांनी सांगितले की, दोघांनी रात्री साडे नऊ वाजता एकत्र जेवले. बायको तणावात असल्याचे त्याला जाणवत होते. पण रात्रीचे जेवण झाल्यावर तो बेडरुममध्ये झोपायला गेला. त्यावेळी बायकोने बाहेरुन दरवाजा बंद केला. मग त्याने बायकोला फोन केला पण त्यावेळेस ती फोन उचलत नव्हती. म्हणून मग त्याने शेजाऱ्यांना बोलावले. जेव्हा तो गच्चीवर प्रितीला शोधण्यासाठी गेला तेव्हा तिचा मृतदेह त्याला दिसला.

नवरा महेंद्रने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपासून प्रिताला सतत ब्लॅकमेल मेसेज आणि फोन येत होते. त्यामुळे याप्रकरणी पोलीस तपास करत आहेत. ८ ऑक्टोबरला रोजी या दोघांचे लग्न झाले होते. प्रितीचा हे दुसरे लग्न होते. प्रितीला पहिल्या लग्नातून ६ वर्षांची मुलगी आहे.


हेही वाचा – फिशफ्राय नाही जमलं, म्हणून सूनेलाच मारून नदीत फेकलं!