रायगड जिल्ह्यात १ सप्टेंबरपासून पोषण महिना अभियान

पोषण माह अभियान सरकारचे महत्त्वाकांक्षी अभियान असून, माता आणि बालकांना सशक्त बनविण्यासाठी त्याचे नियोजन करण्यात आले आहे.

nutrition month campaigh in raigad from 1 september
रायगड जिल्ह्यात १ सप्टेंबरपासून पोषण महिना अभियान

माता आणि बालके सदृढ रहावी यासाठी सरकारतर्फे विविध उपक्रम राबविले जात असून, या अंतर्गत माता आणि बालकांना सशक्त करण्यासाठी रायगड जिल्ह्यात पोषण माह अभियान १ ते ३० सप्टेंबर या कालावधीत राबविले जाणार आहे. यानिमित्ताने अनेक कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील, महिला व बालकल्याण समिती सभापती गीता जाधव, महिला व बालकल्याण विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन मंडलिक यांनी दिली आहे. पोषण माह अभियान सरकारचे महत्त्वाकांक्षी अभियान असून, माता आणि बालकांना सशक्त बनविण्यासाठी त्याचे नियोजन करण्यात आले आहे. महिनाभर चालणारे हे अभियान जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी केंद्रात राबविण्यात येणार आहे. मातेला पोषक आहार आणि चांगली आरोग्य सेवा मिळण्यासाठी आणि त्यांचे योग्यपणे पोषण होण्यासोबतच कुपोषण दूर होण्यासाठीच्या विविध उपायांचा आणि उपक्रमांचा त्यात समावेश आहे.

या अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन कालावधी दरम्यान हात स्वच्छ धुण्याचे महत्त्व पटवून देण्यात येणार आहे. तसेच एकदा गावामध्ये प्रभातफेरी काढून आरोग्य आणि पोषण विषयक संदेशाचा प्रचार-प्रसार करण्यात येईल. त्याचप्रमाणे अनेमियामुक्त भारत कार्यक्रमांतर्गत नियुक्त केलेल्या शाळांच्या नोडल अधिकाऱ्यांच्या मदतीने नियमितरीत्या शाळांतील मुलांना मध्यान्ह भोजन दरम्यान लोहयुक्त गोळ्यांचे वाटप आणि सेवन होईल, असे नियोजन करण्यात येणार आहे.

प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून जिल्हा परिषद शाळांमध्ये पोषण माह कालावधी दरम्यान एक टी-3 कॅम्पचे आयोजन करून विद्यार्थ्यांच्या हिमोग्लोबिनची तपासणी करण्यात येईल. तसेच एएनएम आणि आशा स्वयंसेविका या गृहभेटी देऊन जनजागृती करणार आहेत. अंगणवाडी स्तरावर एक समुदाय आधारित कार्यक्रम, ग्राम आरोग्य स्वच्छता पोषण दिवस आणि बालक संगोपन आधारित पालक मेळाव्याचे आयोजन केले जाणार आहे.

त्याचप्रमाणे आरोग्य विभागाच्या समन्वयाने सॅम बालकांच्या व्यवस्थापनासाठी अंगणवाडी स्तरावर ग्राम बालविकास केंद्राचे आयोजन करावे, तसेच बचत गटाच्या महिला प्रतिनिधींचा प्रभावीपणे सहभाग करण्यात यावा आणि त्यांच्याद्वारे पोषण अभियान बद्दल जनजागृती करण्यात यावी, अशा सूचना डॉ. पाटील, सभापती जाधव आणि मंडलिक यांनी संबंधितांना दिल्या आहेत.

मातून जिल्हा परिषद शाळांमध्ये पोषण माह कालावधी दरम्यान एक टी-3 कॅम्पचे आयोजन करून विद्यार्थ्यांच्या हिमोग्लोबिनची तपासणी करण्यात येईल. तसेच एएनएम आणि आशा स्वयंसेविका या गृहभेटी देऊन जनजागृती करणार आहेत. अंगणवाडी स्तरावर एक समुदाय आधारित कार्यक्रम, ग्राम आरोग्य स्वच्छता पोषण दिवस आणि बालक संगोपन आधारित पालक मेळाव्याचे आयोजन केले जाणार आहे.

त्याचप्रमाणे आरोग्य विभागाच्या समन्वयाने सॅम बालकांच्या व्यवस्थापनासाठी अंगणवाडी स्तरावर ग्राम बालविकास केंद्राचे आयोजन करावे, तसेच बचत गटाच्या महिला प्रतिनिधींचा प्रभावीपणे सहभाग करण्यात यावा आणि त्यांच्याद्वारे पोषण अभियान बद्दल जनजागृती करण्यात यावी, अशा सूचना डॉ. पाटील, सभापती जाधव आणि मंडलिक यांनी संबंधितांना दिल्या आहेत.


हेही वाचा – गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या १८०० नागरिकांसाठी “मोदी एक्सप्रेस” धावणार