घरCORONA UPDATECorona Crisis मुळे ऑलिम्पिक २०२० ऐवजी २०२१ मध्ये!

Corona Crisis मुळे ऑलिम्पिक २०२० ऐवजी २०२१ मध्ये!

Subscribe

करोनाच्या पार्श्वभूमीवर टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा एका वर्षाने पुढे ढकलण्याबाबत जपानचे पंतप्रधान शिंजो आबे आणि आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे (आयओसी) अध्यक्ष थॉमस बॅच सहमत आहेत. आबे आणि बॅच यांच्यात मंगळवारी (आज) टेलिफोनवरुन चर्चा झाली. त्यानंतर आबे यांनी पत्रकारांशी संवाद साधत ही माहिती दिली. त्यामुळे ऑलिम्पिक यावर्षी न होता पुढील वर्षी होणार हे जवळपास निश्चित आहे.

स्पर्धा सुरक्षित होणे गरजेचे

‘खेळाडूंना स्पर्धेच्या तयारीसाठी पुरेसा वेळ मिळावा, प्रेक्षकांसाठी स्पर्धा सुरक्षित व्हावी यासाठी आम्ही आयओसीचे अध्यक्ष बॅच यांना ऑलिम्पिक साधारण एका वर्षाने पुढे ढकलण्याबाबत विचारले. ते आमच्याशी १०० टक्के सहमत होते’, असे जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी सांगितले. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जगातील सर्वच देशांकडून विविध पावले उचलण्यात येत आहेत. करोनाच्या धोक्यामुळे जवळपास सर्वच स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत किंवा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

- Advertisement -

मात्र, असे असतानाही टोकियो ऑलिम्पिक वेळापत्रकानुसार म्हणजेच २४ जुलै ते ९ ऑगस्ट या कालावधीत घेण्याचा आयोजक आणि आयओसीचा मानस होता. परंतु, खेळाडूंकडून ही स्पर्धा पुढे ढकलण्यासाठी दबाव वाढत असल्याने जपानचे पंतप्रधान आबे आणि आयओसीचे अध्यक्ष बॅच यांच्यात आज टेलिफोनवरुन चर्चा झाली. या चर्चेत टोकियोचे राज्यपाल युरिको कोईके, आयोजन समितीचे अध्यक्ष योशिरो मोरी आणि ऑलिम्पिक मंत्री सेइको हाशिमोटो हेसुद्धा सहभागी झाले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -