घरठाणेठाणे: केशरी शिधापत्रिका धारकांना जून महिन्याकरिता सवलतीच्या दरात अन्नधान्य मिळणार

ठाणे: केशरी शिधापत्रिका धारकांना जून महिन्याकरिता सवलतीच्या दरात अन्नधान्य मिळणार

Subscribe

ठाणे शिधावाटप क्षेत्रात राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेंतर्गत समाविष्ट न झालेल्या एपीएल (केशरी) शिधापत्रिका धारकांना जून २०२१ महिन्याकरिता सवलतीच्या दरात अन्नधान्य मिळणार असल्याची माहिती नियंत्रक शिधावाटप आणि संचालक नागरी पुरवठा, मुंबईचे कैलास पगारे यांनी दिली.

राज्यातील कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत केशरी शिधापत्रिकाधारकांना मे– २०२० ते ऑगस्ट–२०२० या चार महिन्याच्या कालावधीकरिता सवलतीच्या दराने गहू ८ रुपये प्रती किलो आणि तांदुळ १२ रुपये प्रती किलो प्रतीमाह प्रतीव्यक्ती ३ किलो गहू आणि दोन किलो तांदुळ याप्रमाणे ५ किलो अन्नधान्याचा सवलतीच्या दराने लाभ देण्यात आला आहे.

- Advertisement -

या योजनेतील अधिकृत शिधावाटप दुकानामध्ये शिल्लक असलेल्या अन्नधान्याचे वाटप केशरी या शिधापत्रिकाधारकांना प्रतीमाह प्रतीव्यक्ती १ किलो गहू आणि १ किलो तांदुळ याप्रमाणे २ किलो अन्नधान्य जून २०२१ करिता गहू ८ रुपये प्रती किलो आणि तांदुळ १२ रुपये प्रती किलो या सवलतीच्या दराने वितरण करण्यात येईल.

जे शिधापत्रिकाधारक अन्नधान्याची प्रथम मागणी करतील (FIRST COME FIRST SERVE) त्यांना सवलतीच्या दराने अन्नधान्य वितरण करण्यात येईल. या योजनेतील ज्या अधिकृत शिधावाटप दुकानामध्ये या योजनेतील अन्नधान्य शिल्लक आहे त्याच शिधावाटप दुकानातून अन्नधान्य वितरण करण्यात येईल.

- Advertisement -

केशरी शिधापत्रिकाधारकांना याद्वारे आवाहन करण्यात येते की, अधिकृत शिधावाटप दुकानात गर्दी न करता सोशल डिस्टन्सिंग ठेवून तसेच मास्कचा घालून सवलतीच्या दराने मिळणारे उपलब्ध अन्नधान्य प्राप्त करून घ्यावे.


हेही वाचा – Mumbai Corona Update: मुंबईत कोरोनामुक्तांच्या संख्येत घट, २८ हजारांहून अधिक अँक्टिव रुग्ण


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -