घरताज्या घडामोडीनवी मुबईतील खाजगी शाळांचे धाबे दणाणले!

नवी मुबईतील खाजगी शाळांचे धाबे दणाणले!

Subscribe

डोनेशन घेऊन प्रवेश देणाऱ्या अपीजय शाळेची चौकशी होणार

डोनेशन घेऊन प्रवेश देणाऱ्या नवी मुबईतील नेरूळ येथील अपीजय शाळा प्राचार्य व संस्था चालक यांच्यावर देणगी प्रतिबंध कायद्या नुसार गुन्हा दाखल करा, असे आदेश शालेय शिक्षण राज्य मंत्री बच्चू कडू यांनी दिले आहेत. त्यामुळे नवी मुंबईतील अन्य खाजगी शाळांचे धाबे दणाणले आहेत. नेरूळ येथील अपीजय शाळा प्राचार्य व संस्था चालक यांनी पालकाकडून शाळा प्रवेशासाठी १,२२,२०१रु. डीडी व ६४५७ रु. ऑनलाईन घेतल्याची तक्रार पालकांनी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या कडे केली, या तक्रारी नुसार शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी शाळेची चौकशी करून डोनेशन प्रतिबंध कायद्या नुसार गुन्हा दाखल करण्याची कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

द महाराष्ट्र एज्युकेशनल इन्स्टिट्यूट कायदा १९८७ नुसार अनुदानित किवा विनानुदानित शाळेत शाळा प्रवेशासाठी डोनेशन घेणे फौजदारी गुन्हा आहे. पालक अजय तापकीर यांनी त्याची मुलगी कथा तापकीर याच्या शाळा प्रवेश वेळी दिलेली डीडी व ऑनलाईन पेमेंट याची झेरॉक्स पुरावा म्हणून जोडला आहे. अपीजय स्कूल नेरूळ मधील प्राचार्य व संस्था चालक यांच्यावर अंतर्गत फौजदारी गुन्हा दाखल करून पालकांचे पैसे परत देण्याची मागणी प्रहार विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष ऍड. मनोज टेकाडे यांनी केली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – नवी मुंबई मनपा क्षेत्रात आणखी १७ कोविड लसीकरण केंद्र !

नवी मुबईतील खाजगी शाळांचे धाबे दणाणले!
Sanjay Mahadikhttps://www.mymahanagar.com/author/sanjay-mahadik/
गेल्या २५ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. प्रिंट, टीव्ही, डिजिटल मीडियाचा अनुभव. सामाजिक, राजकीय विषयांवर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -