घरताज्या घडामोडीआमचा पक्ष सर्वधर्मसमभाव मानणारा -शर्मिला ठाकरे

आमचा पक्ष सर्वधर्मसमभाव मानणारा -शर्मिला ठाकरे

Subscribe

शिवसेनेबद्दल माहीत नाही; पण आमचा पक्ष सर्वधर्मसमभाव मानणारा आहे, असे राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला ठाकरे म्हणाल्या आहेत. गजानन राणे यांच्या दादर इथल्या श्रमिकगड कार्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमाला अमित ठाकरे आणि शर्मिला ठाकरे उपस्थित होत्या, त्यावेळी त्या बोलत होत्या.

इतर पक्षाने काय केलं हे आम्हाला ठाऊक नाही; पण आमचा पक्ष हा मुलांना रोजगार मिळाला पाहिजे, यासाठी आग्रही राहील. वीजबिलात सवलत द्यायची असती तर ती कधीच दिली असती, त्यांना मुळात बिल कमी करायचं नाही आहे, चक्रवाढ व्याज लावून बिलं पाठवली जात आहेत, गोरगरीब बिलं कशी भरणार, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

- Advertisement -

मराठा आरक्षण मिळायलाच हवं ही राज ठाकरेंची भूमिका आधीपासूनच होती. त्यांना न्याय मिळाला नाही की बंड होणारच, असंसुद्धा त्यांनी अधोरेखित केलं आहे. सेना अजानबद्दल काय बोलली, त्यापेक्षा आमचा पक्ष हा सर्वधर्मसमभाव मानतो. तो सगळ्यांच्या पाठीशी उभा आहे, असंसुद्धा त्यांनी अधोरेखित केलं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -