Wednesday, May 5, 2021
27 C
Mumbai
घर CORONA UPDATE Oxygen Flow Meter: ऑक्सिजन फ्लो मीटरचे काम नक्की काय असते? त्याचा तुटवडा...

Oxygen Flow Meter: ऑक्सिजन फ्लो मीटरचे काम नक्की काय असते? त्याचा तुटवडा का जाणवतोय?

Related Story

- Advertisement -

देशात कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत आहे. तर एकीकडे ऑक्सिजनचा पुरवठा होत नसल्याने अनेकांनी जीव गमावला आहे. गेली अनेक दिवस ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे लोकांना वणवण करावी लागत होती. मात्र आता ऑक्सिजन फ्लो मीटरचाही तुटवडा निर्माण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. ऑक्सिजन सिलेंडरप्रमाणेच ऑक्सिजन फ्लो मीटरही तितकाच महत्त्वाचा आहे. मात्र त्यातही काळाबाजार सुरु झाला आहे. ७०० ते ९०० रुपयांना मिळणारा ऑक्सिजन फ्लो मीटरची ९ हजार रुपयांनी विक्री केली जात आहे. ऑक्सिजनचा तुटवडा होता आता ऑक्सिजन फ्लो मीटर काय आहे? ऑक्सिजन सिलेंडरसाठी फ्लो मीटर इतका महत्त्वाचा का आहे? व त्याचा अचानक तुटवडा का निर्माण झाला? या प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या.

ऑक्सिजन फ्लो मीटर म्हणजे काय?

ऑक्सिजन फ्लो मीटर हे ऑक्सिजन सिलेंडरमध्ये वापरले जाणारे एक यंत्र आहे. फ्लो मीटर ऑक्सिजन सिलेंडरमध्ये महत्त्वाची कामगिरी बजावतो. ऑक्सिजन सिलेंडरला जोडलेली एक मध्यम आकाराच्या बाटलीसारखा फ्लो मीटर असतो.  फ्लो मीटर ऑक्सिजन सिलेंडरमधून येणारा ऑक्सिजन रुग्णांपर्यत पोहचवते. फ्लो मीटरच्या माध्यमातून दर तासाला ऑक्सिजन देण्यात येतो. श्वास घेण्यास त्रास होणाऱ्या किंवा तात्काळ मदत लागणाऱ्या रुग्णांना फ्लो मीटर वापरला जातो. फ्लो मीटर वॉल्व ऑक्सिजनपेक्षा जास्त प्रभावी असतो. रुग्णाला ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासाठी फ्लो मीटर महत्त्वाचा आहे.

- Advertisement -

ऑक्सिजन फ्लो मीटरचा तुटवडा का निर्माण झाला?

राज्यातील सर्वात मोठ्या रुग्णालयातही ऑक्सिजनची कमतरता निर्माण झाली होती. रुग्णालयात ज्या रुग्णांना ऑक्सिजन सिलेंडर कमी पडत होते त्यांना ऑक्सिजन फ्लो मीटरही कमी पडत आहेत. ऑक्सिजन सिलेंडरसोबतच फ्लो मीटरही वेळेवर मिळणे गरजेचे आहे. ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या एका एजेंसीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्याने सांगितल्यानुसार, रुग्णालायात रुग्ण ऑक्सिजन फ्लो मीटरला हात लावतात. तो खालून पाहण्यासाचा प्रयत्न करतात. सतत उघड बंद केल्याने  फ्लो मीटर तुटतो. ज्यामुळे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे ऑक्सिजन फ्लोचा तुटवडा निर्माण झाला असे म्हटले जात आहे.

मागणी वाढल्याने पुरवठा खंडीत

- Advertisement -

देशात अनेक ठिकाणी ऑक्सिजन सिलेंडर प्रमाणेच ऑक्सिजन फ्लो मीटरची गरज निर्माण झाली. मागणी वाढल्याने पुरवठा कमी झाला. अनेक ठिकाणी फ्लो मीटरचा पुरवठा कमी झाल्याने फ्लो मीटर विकणे बंद करण्यात आले आहे. ज्या लोकांकडे ऑक्सिजन फ्लो मीटर उपलब्ध होते त्यांनी ते जास्त किंमतीला विकले. बरेच जण ऑक्सिजन फ्लो मीटरमध्ये काळाबाजार करुन ते विकत आहेत.


हेही वाचा – रायगडमध्ये ९० जणांना Remdesivir इंजेक्शनचा त्रास, जिल्ह्यात इंजेक्शनचा वापर थांबवला

 

 

- Advertisement -