घरताज्या घडामोडीपाकिस्तानचे पंतप्रधान Imran Khan यांच तिसऱ्या पत्नीशीही जमेना, भांडणानंतर सोडले घर?

पाकिस्तानचे पंतप्रधान Imran Khan यांच तिसऱ्या पत्नीशीही जमेना, भांडणानंतर सोडले घर?

Subscribe

पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान (Imran Khan) यांची तिसरी पत्नी बुशरा यांच्यासोबत (bushra bibi) भांडण झाले आहे आणि त्यांची पत्नी बनी गला हे घर सोडून आपल्या मैत्रिणीच्या लाहोरमधील घरी राहत असल्याचा दावा एका पत्रकाराने केला आहे. पण इमरान खान तिसऱ्या पत्नीपासून विभक्त झाल्याच्या दावा इमरान खान यांचे राजकीय संवादावरील विशेष सहाय्यक शाहबाज गिल यांनी हे वृत्त रविवारी फेटाळले आणि म्हटले की, ‘या दावा केलेल्या पत्रकार विरोधात तक्रार कोर्टात केली जाईल.’

शाहबाज गिल म्हणाले की, ‘पाकिस्तानच्या पहिल्या महिलेबाबत खोटी बातमी पसरवण्याविरोधात कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल.’ पाकिस्तान न्यूज वेबसाईट जिओ न्यूजच्या वृत्तानुसार, ‘शनिवारी एक पत्रकाराने दावा केला होता की, पंतप्रधान इमरान खान यांच्यासोबत बुशरा यांचे भांडण झाले आहे आणि त्या मैत्रीण फराह खान यांच्या घरी राहत आहेत. बनी गला सोडून त्या लाहोर गेल्या आहेत. दरम्यान ही अफवा वेगाने पाकिस्तानच्या सोशल मीडियावर पसरली आहे आणि लोक याबाबत अनेक तर्क-वितर्क लावत आहे.

- Advertisement -

बुशरा यांची मैत्रिण काय म्हणाली?

बुशरा यांची मैत्रिण फराह खान यांनी इमरान खान आणि बुशरा यांच्यातील भांडण झाल्याचे वृत्त फेटाळले आहे. त्या म्हणाल्या की, ‘बुशरा त्यांच्या घरी राहत नसून इमरान खान यांच्या घरी राहत आहेत. ही बातमी पसरल्यामुळे मी हैराण आहे. कारण बऱ्याच वेळापासून बुशरा या लाहोरमध्ये आल्याच नाहीत. त्या अजूनही आपल्या पतीसोबत बनी गलामध्ये राहत आहेत आणि त्यांच्यात भांडण झालेले नाही. लोकांचे खासगी आयुष्य राजकारणात ओढू नये.’

शाहबाज गिल यांनी ही बातमी पूर्णपणे चूकीची असून पंतप्रधान इमरान खान आणि बुशरा सध्या इस्लामाबादमध्ये आपल्या घरी राहत आहेत. त्यांच्या विभक्त झाल्याच्या अफवा पूर्णपणे खोट्या आहेत, असे सांगितले.

- Advertisement -

हेही वाचा – Valentines Day निमित्ताने पाकिस्तानी मेडिकल कॉलेजमध्ये मुला-मुलींसाठी अजब नियम


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -