घरताज्या घडामोडी'पाकिस्तान जिंदाबाद'ची घोषणा देणाऱ्या मुलीची कोठडीत रवानगी

‘पाकिस्तान जिंदाबाद’ची घोषणा देणाऱ्या मुलीची कोठडीत रवानगी

Subscribe

एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी वारिस पठाण यांना माध्यमांशी चर्चा करण्यास बंदी घातली आहे. वारिस पठाण यांनी गुरुवारी चिथावणीखोर विधान कलबुर्गी येथील सभेत केलं होतं.

गुरुवारी बंगळुरूमध्ये नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात (CAA) एका सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी, ‘ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुसलमीन’चे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी मंचावर असताना सभेला आलेल्या एका मुलीने मंचावर दाखल होत ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा दिल्या. अमूल्या असे या तरुणीचे नाव आहे. ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा देणाऱ्या या तरुणीला न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

गुरुवारी घडलेल्या घटनेवेळी ओवैसी मंचावर उपस्थित होते. पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्या अमूल्याला ओवैसी आणि आयोजकांनी थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, अमूल्या थांबली नाही. यामुळे पोलिसांनी हस्तक्षेप करून अमूल्या हिला ताब्यात घेत तिला बंगळुरूच्या न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने तिला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

- Advertisement -

वारिस पठाण यांच्या चिथावणीखोर वक्तव्याचे उमटले तीव्र पडसाद

- Advertisement -

आम्ही १५ कोटी असलो तरी १०० कोटींना भारी आहोत, असे वादग्रस्त विधान पठाण यांनी कर्नाटकात कलबुर्गी येथील सभेत केले होते. पठाण यांच्या चिथावणीखोर वक्तव्याचा सर्वांनी खरपुस समाचार घेतला आहे. या विधानाचे राजकिय वर्तुळात तिव्र पडसाद उमटले आहेत. एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी वारिस पठाण यांच्यावर कारवाई करत माध्यमांशी चर्चा करण्यास बंदी घातली आहे.

“वारिस पठाण यांच्या विधानाने मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी सीएए आंदोलनातील शक्तिप्रदर्शनाबाबत दिलेला इशारा खरा ठरविल्याचे मनसे नेत्या शालिनी ठाकरेंनी म्हटले आहे.”

भारतात सगळे हिंदुस्थानी राहतात यामुळे वारिस पठाण यांनी आपले शब्द परत घ्यावेत. समाजात तेढ निर्माण करणे योग्य नाही. पठाण यांनी शिर्डीला जावे आणि श्रद्धा सबुरी शिकावी. देश सगळ्यांचा आहे हे लक्षात ठेवा, असे शिवसेना नेते आणि मंत्री अब्दुल सत्तार म्हणाले.

वारिस पठाण यांचे विधान मुस्लीम समाज ऐकणार नाही. त्यांचे ऐकले असते तर ते निवडून आलेच असते. भाजपच्या सांगण्यावरून वारिस पठाण वातावरण दूषित करत असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केला.

“बेवकूफ, जाहील, तू कोणाची नोकरी करत आहेस? एकत्र राहण्याच्या काळात असं बोलत असाल तर तुम्ही १५ कोटीच राहाल”, असा हल्लाबोल जावेद अख्तर यांनी केला.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -