अलिबाग : बहिरीचापाडा खारलँडची कामे वेळीच करा – आमदार पंडित पाटील

बहिरीचा पाड्यामधील बंधारा फुटल्याने झालेल्या नुकसानीची पंडित पाटील याची पाहणी.

Pandit Patil inspects the damage caused by the bursting of the dam at Bahiri Pada
बहिरीचापाडा खारलँडची कामे वेळीच करा, नाहीतर...

अलिबाग तालुक्यातील बहिरीचापाडा गावाला लागून असलेल्या बाहेरील काठयाला उधानाच्या पाण्याने मोठे भगदाड पडले. त्यामुळे समुद्राचे पाणी गावात शिरले. नागरिकांच्या घरात पाणी शिरून मोठे नुकसान झाले आहे. हे समजताच पंडित पाटील व रायगड जिल्हा परिषद सदस्या भावना पाटील यांनी घटनास्थळी जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. मानकुळे बहिरीचा पाडा येथील खारलँडची कामे जर वेळीच केली नाही तर भविष्यात या गावाचे पुनर्वसन करण्याची नामुष्की शासनावर ओढवेल. तात्काळ नियमांचे अडथळे दूर करून या कामाची पूर्तता करावी, अशी मागणी शेकाप नेते माजी आमदार पंडित पाटील यांनी केली आहे.

आपण आमदार असताना सरकारकडून भांडून ११ कोटी मंजूर करून दिले होते. मात्र संबंधित विभाग ज्या गतीने काम करायला हवे त्यागतीने करत नाही, असा आक्षेप देखील पंडित पाटील यांनी व्यक्त केला. मानकुळे ग्रामपंचायत हद्दीतील गणेशपट्टी गावचे पुनर्वसन या पूर्वीच केले आहे.भविष्यात बहिरीचा पाडा गाव पुनर्वसनाच्या उंबरठ्यावर असल्याची भीती देखील पंडित पाटील यांनी व्यक्त केली आहे. खार बंधिस्तीसाठी आलेला तसेच तात्काळ त्यासाठी निधी उपलब्ध करून लवकरात लवकर काम पूर्ण करण्याच्या सूचना देखील त्यांनी केली आहे.

यावेळी त्यांच्या सोबत अलिबाग तालुका पंचायत समिती सभापती प्रमोद ठाकूर, पंचायत समिती सदस्य प्रकाश पाटील, माजी उपसभापती अनिल पाटील, सिद्धनाथ पाटील, उपसरपंच दीपक पाटील मोठया संघाने बहिरिचापाडा ग्रामस्थ, जगन्नाथ म्हात्रे, सुभाष पाटील, प्रल्हाद पाटील, भालचंद्र पाटील आदी उपस्थित होते. पंडित पाटील यांनी ताबडतोब अलिबाग तालुका तहसिलदार यांना घटनास्थळी जाण्यास सांगितले तसेच तलाठी,सर्कल, विस्तार अधिकारी याना ताबडतोब झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यास सांगितले.


हेही वाचा – पंतप्रधान मोदी लोकप्रिय नेत्यांच्या यादीत अव्वल! Twitter वर फॉलोअर्सची संख्या ७ कोटी पार