घरताज्या घडामोडीनाराज पंकजा मुंडेंना मुख्यमंत्रीच शिवसेनेत येण्याची ऑफर देतील!

नाराज पंकजा मुंडेंना मुख्यमंत्रीच शिवसेनेत येण्याची ऑफर देतील!

Subscribe

संजय राऊत यांचे सुतावाच

एकनाथ खडसे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश झाल्यानंतर भाजपच्या नेत्या आणि माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्याबद्दलही शिवसेनेत प्रवेशाची राजकीय चर्चा सुरू झाली आहे. पंकजा या नाराज असून त्या लवकरच भाजप सोडतील असे बोलले जाते. याविषयी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सूचक विधान केले आहे. ‘पंकजा मुंडे यांना शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच पक्षात येण्याची ऑफर देऊ शकता’, असे राऊत म्हणाले.

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पुण्यात शनिवारी पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी राऊत यांनी आपल्या शैलीत चौफेर फटकेबाजी केली. यावेळी पत्रकारांनी पंकजा मुंडे यांच्या शिवसेनेच्या प्रवेशाच्या चर्चेबद्दल विचारले असता राऊत म्हणाले,‘पंकजा मुंडे या भाजपच्या चांगल्या नेत्या आहे. त्यांच्याशी शिवसेनेचे चांगले संबंध आहे. त्यामुळे पंकजा मुंडे यांना जर पक्षात घ्यायचे असेल तर त्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे ऑफर देतील.’

- Advertisement -

‘सरकारला एक वर्ष पूर्ण होत आहे. पण काही लोकांना वाटत होतं की, हे सरकार १५ दिवसात कोसळेल. पण, हे सरकार पूर्ण ताकदीने चाललेले आहे. मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी कोरोनाची लढाई यशस्वीपणे सांभाळली आहे, असेही राऊत म्हणाले.

‘शरद पवार सरकार चालवतात हा आरोप चुकीचा आहे. शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत. ते महाविकास आघाडी सरकारला वेळोवेळी मार्गदर्शन करत असतात. ते वरिष्ठ नेते असल्यामुळे सरकारला सल्ला देतात. आता याबद्दल चंद्रकांत पाटलांनी वाईट वाटून घेण्याचं कारण नाही. कदाचित मोदी आजही पवारांचे मार्गदर्शन घेत असतील’, असं म्हणत राऊत यांनी सणसणीत टोला लगावला.

- Advertisement -

‘आघाडी सरकारसमोर विरोधी पक्षाकडून आव्हानं निर्माण केली जात आहेत. केंद्र सरकारला वाटतं विरोधी पक्ष राहूच नये, आमचं मात्र तसं नाही. आम्ही विरोधकांचे नेहमीच स्वागत करतो. आज बिहारमध्ये तेजस्वी यादव हिंमतीने लढतोय, लाखोंच्या सभा घेतोय. उद्या बिहारमध्ये तेजस्वी यादव मुख्यमंत्री झाले तर आश्चर्य वाटणार नाही, याकडे राऊत यांनी लक्ष वेधले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -