नवी मुंबई : पनवेल ते मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल हार्बर मार्गाने प्रवास करणार्या प्रवाशांना खांदेश्वर स्थानकानजीक सिग्नल यंत्रणेत तांत्रिक बिघाड झाल्याने अडकून पडावे लागले. त्यामुळे लोकलच्या रांगा लागल्या होत्या. या ठिकाणी दुरुस्ती काम रेल्वे प्रशासनाने हाती घेतले आहे. मात्र संध्याकाळी साडेचार वाजेपर्यंत दुरुस्तीचे काम पुर्ण न झाल्याने सकाळी कामावर आलेल्या चाकरमन्यांना घरी परतीचा प्रवास करताना लोकलच्या गोंधळाला सामोरे जावे लागले. (Panvel-CST Harbour railway line have been disrupted due to a cable fault near Panvel station) केबल दुरूस्तीचं काम सुरू करण्यात आलं. अडीच तासानंतर संध्याकाळी लोकल सेवा पुर्ववत झाली असली तरी १० मिनीटे लोकल उशिरा असल्याची माहिती प्रवाशांनी दिली.
दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास तांत्रिक बिघाड झाल्यामुळे पनवेल-सीएसएमटी दरम्यानची अप आणि डाऊन दोन्ही मार्गावरची वाहतूक कोलमडली आहे. दुपारी अडीच वाजल्यापासून हार्बर लोकलचा खोळंबा झाल्याने खांदेश्वर, मानसरोवर स्टेशना दरम्यान लोकलच्या रांगा लागल्या होत्या. दुपारी कामावर जाणार्या अनेक प्रवाशांनी बराच वेळ लोकल थांबल्याने उतरुन पायी चालत जात मार्गक्रमण केले. सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने दुपारपासूनच २० मिनीटे लोकल उशिरा धावत होत्या. त्यामुळे पनवेल रेल्वे स्थानकात प्रवाशांची गर्दी झाल्याचे पहावयास मिळाले. संध्याकाळी साडेपाच दरम्यान लोकल सेवा संथगतीने सुरु झाली.
पनवेल-सीएसएमटी हार्बर मार्गावर २ सप्टेंबर रोजी नेरूळ स्थानकात ओव्हर हेड वायर तुटली तांत्रिक बिघाड झाल्याने प्रवाशांना मनस्ताप सोसावा लागला होता. दर दोन महिन्यांनी हार्बर मार्गावरील लोकलचा खोळंबा होत असल्याने प्रवाशी हैराण झाले आहेत.
वाशी व बेलापूर येथून सुटणार्या सीएसएमटी, वडाळा लोकलचा आधार काही प्रवाशांनी घेतला आधार घेतला. काही काळ सेवा पूर्णपणे विस्कळीत झाली होती पण रेल्वेकडून तांत्रिक दोष दुरूस्त करून पुन्हा वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केल्यानंतर लोकल सेवा धीम्यागतीने सुरु करण्यात आली.