घरताज्या घडामोडीतिसर्‍या संभाव्य लाटेला तोंड देण्यास पनवेल महानगरपालिका सज्ज; आयुक्त सुधाकर देशमुखांचा आशावाद

तिसर्‍या संभाव्य लाटेला तोंड देण्यास पनवेल महानगरपालिका सज्ज; आयुक्त सुधाकर देशमुखांचा आशावाद

Subscribe

पनवेल महानगरपालिका सिडकोच्या माध्यमातून कळंबोली येथील भारतीय कापूस निगम येथे जंबो कोविड सेंटर उभे करत आहे.

कोरोनाची तिसरी लाट आल्यास पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्यावर आयुक्त . गणेश देशमुख यांचा भर असून महानगरपालिकेचे ६३५ खाटांचे जंबो कोविड सेंटर अधिक महत्त्वाचे ठरणार आहे. याच पार्श्वभूमीवर आज जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी आणि आयुक्त गणेश देशमुख यांनी कळंबोली येथील भारतीय कापूस निगम येथील नव्या जंबो कोविड सेंटरला भेट देऊन पाहणी केली. यावेळी पालिका राबवित असलेल्या उपाययोजनांची माहिती आयुक्तांनी जिल्हाधिकार्‍यांना दिली. तिसरी लाट आल्यास रायगड जिल्ह्याच्या विविध ठिकाणाहून  रुग्ण पनवेलमध्ये येण्याची शक्यता लक्षात घेऊन पनवेल महापालिकेने स्वत:ला सज्ज केले असल्याचे आयुक्त देशमुख यांनी जिल्हाधिकार्‍यांना अश्वस्त केले.

पनवेल महानगरपालिका सिडकोच्या माध्यमातून कळंबोली येथील भारतीय कापूस निगम येथे जंबो कोविड सेंटर उभे करत आहे. या सेंटरची पाहणी पहाणी बुधवारी (४ ऑगस्ट) जिल्हाधिकारी निधी चौधरी आणि आयुक्त गणेश देशमुख यांनी केली. यावेळी प्रांताधिकारी दत्तात्रय नवले, तहसीलदार विजय तळेकर, पालिका मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. आनंद गोसावी, कार्यकारी अभियंता संजय कटेकर, सिडको कार्यकारी अभियंता डी.एम. बोकाडे, सहाय्यक कार्यकारी अभियंता अरविंद जाधव आदी उपस्थित होते. जिल्हाधिकार्‍यांनी या ठिकाणच्या सर्व विभागांची माहिती घेतली. तिसर्‍या लाटेच्या पार्श्वभूमीवर आयुक्त देशमुख यांनी ऑक्सीजन पुरवठा, डॉक्टर्स, औषधे, अन्न पुरवठा, या सर्व निविदांची कामे शेवटच्या टप्प्यात  असल्याचे सांगितले. एकूणच जंबो कोविडचे काम पाहून जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनीही समाधान व्यक्त केले.

- Advertisement -

या ६३५ खाटांच्या जंबो कोविड सेंटरमध्ये ५०५ ऑक्सीजन खाटा, आयसीयू प्रौढांसाठी १०० खाटा, आयसीयू पिडियाट्रिक  २५ खाटा, ट्रायएजसाठी ५ खाटा असणार आहेत. सध्या या रूग्णालयाचे काम युध्दपातळीवर सुरू असून ऑक्सीजन पाईप लाईनचे काम पूर्ण झाले आहे. विविध विभाग तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. येत्या काही दिवसात सर्व रूग्णालयीन उपकरणे याठिकाणी बसविण्यात येणार आहे. १५ ऑगस्टपर्यंत सर्व कामे पूर्ण करण्यात येणार असल्याचे सिडकोच्यावतीने सांगण्यात आले.


हेही वाचा – कोकण, पश्चिम महाराष्ट्रातील खराब रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी १०० कोटी मंजूर, नितीन गडकरींची माहिती

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -