घरताज्या घडामोडीपेण-खोपोली रस्ता कामाला ब्रेक, अपघातांचं प्रमाण वाढलं

पेण-खोपोली रस्ता कामाला ब्रेक, अपघातांचं प्रमाण वाढलं

Subscribe

गेल्या अनेक दिवसांपासून रस्त्याच्या रूंदीकरणाचे काम सुरू आहे.

पेण खोपोली मार्गावर रस्ता रूंदीकरणाचे काम अत्यंत संथगतीने सुरू असून, यामुळे वाहतुकही संथ होत असताना दुसरीकडे जीवघेण्या अपघातांचे प्रमाणही वाढीस लागल्याने चिंता व्यक्त होत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून रस्त्याच्या रूंदीकरणाचे काम सुरू आहे. दिवस-रात्र छोट्या-मोठ्या वाहनांची वर्दळ असल्यामुळे रस्त्याच्या कामाचा वेग वाढविणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात ते आरामात चालल्याचे दिसत आहे. काम सुरू असताना अपघात होऊ नये म्हणून कोणतीही काळजी घेण्यात आलेली नाही. रस्त्याचा काही भाग सुस्थितीत असल्याने वाहने वेगाने येतात. परंतु त्यानंतर लगेचच अर्धवट काम झालेला रस्ता सुरू होतो आणि हेच नेमके अनेकदा चालकाच्या लक्षात येत नाही. त्यामुळे अचानक वेग कमी करावा लागत असल्या कारणाने वाहनाचा अपघात होतो. यात एखादा अपघात जीवघेणाही ठरू शकतो.

गेल्या ३१ ऑगस्ट रोजी गणपतीवाडी (पेण) येथे राहणारे सुरेश कदम यांचा रस्ता नादुरुस्त असल्यामुळे अपघाती मृत्यू झाला. त्यावेळी ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन केले. पोलिसांनी यात हस्तक्षेप करून संबंधित ठेकेदार आणि अधिकारी यांची बैठक घेण्याचे आश्वासन देऊन आंदोलन मागे घेण्यास सांगितले. या रस्त्याचे काम जे. एम. म्हात्रे इन्फ्रा कंपनीमार्फत सुरू असलेल्या कामाची गती इतकी संथ का, असा सवाल आता उपस्थित झाला आहे.

- Advertisement -

हे ही वाचा – कल्पिता पिंपळेंच्या हल्लेखोरावर मोक्काअंतर्गत कारवाई करा, दरेकरांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -