Pen : अवकाळी पावसामुळे भाजीपाला लागवड थांबली

Pen: Vegetable cultivation stopped due to unseasonal rains
Pen : अवकाळी पावसामुळे भाजीपाला लागवड थांबली

पेण तालुक्यातील ग्रामीण भागात ऑक्टोबर महिन्यापासून मोठ्या प्रमाणावर वेलवर्गीय भाजीपाल्याची लागवड केली जाते आणि ज्या जमिनीवर इतर भाजीपाल्याची लागवड करावयाची त्या ठिकाणीची साफसफाई, नांगरणी करून मशागतीची कामे करण्यास सुरुवात झाली होती. मात्र अवकाळी पावसाने ही लागवड आता थांबली आहे.

गेल्या दोन वर्षांत कोरोनामुळे शेतकर्‍यांची आर्थिक घडी विस्कटली. शेतीमालाला हमीभाव पाहिजे त्या प्रमाणात मिळत नव्हता. त्यातच संचारबंदीमुळे भाजीपाला व्यवसाय सोडण्याची वेळ आली. त्यामुळे मागील नुकसानीचे ओझे डोक्यावर असलेल्या शेतकर्‍यांनी ऑक्टोबर महिन्याच्या हंगामाला सुरवात करताच अवकाळी पावसाने फटका दिला. टोमॅटो, वांगी, मिरची यासारख्या गादी वाफ्यामध्ये पाणी साचल्याने या पिकांची हानी होण्याची भीती शेतकर्‍यांना आहे. याशिवाय बदलत्या हवामानामुळे पिकांवर रोगाची शक्यता बळावल्याने औषधांची फवारणी केली जात आहे. सध्या तालुक्यात कोवळया पिकावरच फवारणी करावी लागत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. याबाबत कृषी विभागाने मार्गदर्शन करण्याची मागणी शेतकरी करीत आहेत.दरम्यान, न थांबलेला पाऊस, सूर्यप्रकाशाचा अभाव, ढगाळ हवामान याचा फटका भाजीपाल्यावर होण्याची शक्यता असल्याने हंगामात भाज्यांचे भाव यावर्षीही कडाडण्याची शक्यता जाणकार व्यक्त करीत आहेत.


हे ही वाचा – ‘अंजिक्य’ चित्रपटाला चाहत्यांची पसंती ; देशाच्या शेतकऱ्यांना समर्पित होणारा चित्रपट