घरठाणेमुलुंड, ठाणेकरांनो पाणी उकळून प्या; पालिका प्रशासनाचे आवाहन

मुलुंड, ठाणेकरांनो पाणी उकळून प्या; पालिका प्रशासनाचे आवाहन

Subscribe

मुंबईला पाणीपुरवठा करणार्‍या जल बोगद्याला ठाणे जिल्ह्यात मोठी हानी झाली आहे. या जल बोगद्याच्या दुरुस्तीचे काम पालिका जल अभियंता खात्यामार्फत हाती घेण्यात येणार आहे. २० जानेवारीपासून भांडुप संकुलात नवीन पाणी वितरण व्यवस्थेद्वारे होणार पाणीपुरवठा तात्पुरता बंद केला जाईल. जुन्या पाणी वितरण व्यवस्थेमार्फत पाणीपुरवठा केला जाईल.

मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणार्‍या जल बोगद्याला ठाणे जिल्ह्यात मोठी हानी झाली आहे. या जल बोगद्याच्या दुरुस्तीचे काम पालिका जल अभियंता खात्यामार्फत हाती घेण्यात येणार आहे. २० जानेवारीपासून भांडुप संकुलात नवीन पाणी वितरण व्यवस्थेद्वारे होणार पाणीपुरवठा तात्पुरता बंद केला जाईल. जुन्या पाणी वितरण व्यवस्थेमार्फत पाणीपुरवठा केला जाईल. परिणामी मुलुंड व ठाणे परिसरात जलशुद्धीकरण प्रक्रियेशिवाय पाणी पुरवठा होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणी उकळून व गाळून वापरावे आणि प्यावे, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे. (People Of Mulund Thane drink boil water Appeal of municipal administration)

मुंबईला व ठाणे येथील काही भागांना ठाणे जिल्ह्यातील तानसा, मोडकसागर, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा आणि भातसा या पाच तलावांमधून दररोज ३,८५० दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा होतो. मुंबई महापालिकेने आतंकवादी हल्ल्यापासून जलवाहिन्यांचे संरक्षण होण्यासाठी ठाणे व मुंबई भागात काही ठिकाणी पाणीपुरवठा करणारी मोठी जलवाहिनी जलबोगद्याद्वारे भूमिगत केली आहे. या जलबोगद्याला ठाणे जिल्ह्यात एका ठिकाणी कूपनलिकेचे काम चालू असताना मोठी हानी झाली. त्यामुळे पालिका जल अभियंता खात्यामार्फत २० जानेवारीपासून दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे.

- Advertisement -

त्यामुळे मुलुंडमधील वीणा नगर, वैशाली नगर, स्वप्ननगरी, योगी हिल्स तसेच मुलुंड पश्चिम विभागातील तांबे नगर चेकनाका व ठाणे येथील किसन नगर या परिसरात २० जानेवारीपासून प्रक्रियेशिवाय पाणीपुरवठा होणार आहे. त्यामुळे मुलुंड पश्चिम येथील नागरिकांनी पुढील सूचना मिळेपर्यंत कृपया पाणी गाळून व उकळून पिण्याचे आवाहन महापालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.


हेही वाचा – PM Modi Mumbai Visit : उद्या मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेत बदल, ‘या’ मार्गांचा करा वापर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -