Thursday, May 6, 2021
27 C
Mumbai
घर CORONA UPDATE Pfizer Pill: लसीसोबत मिळणार गोळीचाही पर्याय, घरीच करा कोरोनावर मात, Pfizer आणतेय...

Pfizer Pill: लसीसोबत मिळणार गोळीचाही पर्याय, घरीच करा कोरोनावर मात, Pfizer आणतेय गोळ्या

ही गोळी प्रोटीज इनहिबिटींग तंत्रावर आधारित

Related Story

- Advertisement -

देशात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण सुरु आहे. मात्र लसीबाबत अनेकांच्या मनात अनेक प्रश्न आहेत. तरीही देशात मोठ्या प्रमाणात लसीकरण पार पडले आहे. लवकरत कोरोना प्रतिबंधात्मक गोळा बाजारात येण्याची शक्यता आहे. फायझर(Pfizer) ही कंपनी कोरोनावरील गोळी तयार करण्याचे काम करत आहे. कोरोनावर लस घेण्याएवजी गोळी उपलब्ध झाली तर कोरोना रुग्णांना रुग्णालयात जाण्याची गरज पडणार नाही. इतर आजारांप्रमाणे घरीच गोळ्याचा खाऊन उपचार करता येतील. वर्षांअखेरीस ही लस बाजारात येईल असे सांगण्यात येत आहे. त्यामुळे जर तुम्हाला लस घ्यायची नसेल किंवा भिती वाटत असेल तर घाबरु नका आता कोरोनावर औषध म्हणून गोळी खाता येणार आहे. लसीसोबतच गोळाचाही पर्याय मिळाल्याने घरीच कोरोनावर मात करता येणार आहे.  मात्र त्यासाठी वर्षाअखेरीस वाट पहावी लागणार आहे.

फायझर तयार करत असलेली कोरोनावरील औषधाच्या गोळीची अमेरिका आणि बेल्जियममधील फायझर कंपनीत औषधाच्या चाचण्या सुरु आहे. ही गोळी प्रोटीज इनहिबिटींग तंत्रावर आधारित आहे. हेच तंत्र HIV -ADSच्या विरोधात यशस्वी ठरले होते. फायझर कंपनीच्या रिसर्च अँन्ड टेस्टिंग फॅलिलिटीज विभागात या औषधाच्या चाचण्या जर यशस्वी झाल्या वर्षाअखेरीस कोरोनाच्या गोळीचे उत्पादन सुरु होईल. कोरोनाची गोळी आली तर कोरोनातून बाहेर पडण्यासाठीचा एक जलद आणि सोपा मार्ग सुरु होईल.

- Advertisement -

द टेलिग्राफने दिलेल्या वृत्तानुसार, फायझर औषधी रसायनशास्र विभागाचे संचालक डेफिड ओवेन यांनी असे म्हटले आहे की, कोरोनाच्या काळात आम्ही ही अँन्टीव्हायरल गोळी तयार केली होती. त्याचप्रमाणे एकूण २१० संशोधकांनी प्रयत्न करुन गेल्या वर्षी ऑर्डननुसार १ किलोग्रॅम औषध तयार केले होते. या गोळीने जगातील प्रत्येक देशात आरोग्य यंत्रणेवर असलेला ताण निश्चित कमी करु शकतो असे फायझर कंपनीने म्हटले आहे. सध्या फायझर,रोचे आणि अँस्ट्राझेनेका या कंपन्या कोरोनावर प्रभावी ठरु शकतील अशी औषधे गोळ्यांच्या स्वरुपात तयार करत आहेत.


हेही वाचा – देशात ऑक्सिजनचे टेंशन मिटणार, १ लाख ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटर्स मदतीला

- Advertisement -

 

 

- Advertisement -