Lancet: Pfizer लसीचा तिसरा डोस गंभीर कोविड संसर्ग कमी करण्यात सर्वाधिक प्रभावी

दोन डोस घेतलेल्या व्यक्तींच्या तुलनेत ज्या व्यक्तींनी लसीचे तीन डोस घेतले आहे. त्यांच्यात कोरोनोचा धोका ९२ टक्के कमी होता.

Pfizer vaccina third dose is more effective to reduse covid 19 illness
Lancet: Pfizer लसीचा तिसरा डोस गंभीर कोविड संसर्ग कमी करण्यात सर्वाधिक प्रभावी

एका अभ्यासात फायझर बायोएनटेक लसीचा तिसरा डोस हा गंभीर कोरोना संसर्ग कमी करण्यात सर्वाधिक प्रभावी ठरत असल्याचे समोर आले आहे. गंभीर स्वरुपातील कोरोना संसर्ग कमी करण्यात फायझरचा तिसरा डोस दोन डोसच्या तुलनेत अधिक प्रभावी असल्याचे सांगण्यात येत आहे. समोर आलेल्या परिणामांनुसार, पाच महिने आधी केवळ दोन डोस घेतलेल्या व्यक्तींच्या तुलनेत ज्या व्यक्तींनी लसीचे तीन डोस घेतले आहे. त्यांच्यात कोरोनोचा धोका ९२ टक्के कमी होता. तर ८१ टक्के व्यक्तींमध्ये कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचा धोका ८१ टक्के कमी झाला होता.

इजराइलच्या क्लॅलिट रिसर्च इंस्टिट्यूटचे संशोधक रैना बालिसर यांनी दिलेल्या माहितीनुसार, फायझर लसीचा तिसरा डोस एक आठवड्यानंतर विविध वयोगटातील समूह आणि जनसंख्येमध्ये गंभीर स्वरुपातील संसर्ग कमी करण्यास प्रभावी ठरत आहे. द लँसेंटमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या अभ्यासात असे म्हटले आहे की, ज्यांना 162बी2 बीएनटी लसीचा तिसरा डोस मिळाला होता अशा १२ आणि त्याहून अधिक वयोगटातील ७,२८,३२१ व्यक्तींचा डेटा गोळा करुन त्यावर अभ्यास केला.

७,२८,३२१ व्यक्तींना अशा व्यक्तीसोबत सोबत एकत्र करण्यात आले ज्यांना कमीत कमी पाच महिने आधी 162बी2 लसीचे दोन देण्यात आले होते. यात संसर्गाचा धोका, गंभीर आजाराचा धोका,सध्याची आरोग्य परिस्थितीशी जोडलेल्या लोकसंख्यिकीय, भौगोलिक आणि आरोग्याशी संबंधित वैशिष्ट्यांवर समावेश होता. व्यक्तींच्या बदलत्या लसीकरण स्थितीच्या आधारावर गतिशील रुपात प्रत्येक समूहात देण्यात आला होता.


हेही वाचा – हवेतील प्रदूषण आणि हॉर्नच्या गोंगाटामुळे हार्ट अटॅकचा धोका