घरताज्या घडामोडीपूरग्रस्त गावांमध्ये प्लास्टिक संकलन मोहीम

पूरग्रस्त गावांमध्ये प्लास्टिक संकलन मोहीम

Subscribe

प्लास्टिकचे व्यवस्थापन करण्याच्या दृष्टीने प्लास्टिक पुनर्निर्माण प्रक्रियेसाठी कारखान्यांमध्ये पाठविण्यात आले आहे.

महाड तालुक्यातील पूरग्रस्त गावांमध्ये रायगड जिल्हा परिषद, महाड पंचायत समिती, नेहरू युवा केंद्र यांच्या मार्गदर्शनाखाली पूरग्रस्त गावांमध्ये प्लास्टिक संकलन मोहीमयात १८ गावांमध्ये ५० स्वयंसेवकांनी २ टन प्लास्टिक आणि प्लास्टिक बाटल्यांचा कचरा गोळा केला. जमा करण्यात आलेले प्लास्टिक पुनर्निर्माण प्रक्रियेसाठी कारखान्यांमध्ये पाठविण्यात आले आहे.

पूरबाधित महाडमधील दादली, कोथेरी, शिरगाव, कोल, कोलबौद्धवाडी, वडवली, चोचिंदे, कोंडिवते, बौद्धवाडी, राजेवाडी, काळींज, खरवली, आदिवासीवाडी काळींज, बिरवाडी,आकले,आसनपोई, कांबळे तर्फे महाड, नडगाव तर्फे बिरवाडी, अमशेत या ठिकाणी प्लास्टिक संकलन मोहीम राबविण्यात आली. रायगड जिल्हा परिषद, महाड पंचायत समिती यांच्या मार्गदर्शनाखाली ५० स्वयंसेवकांनी दिवसभरात २ टन प्लास्टिक आणि प्लास्टिक बाटल्या असा कचरा सिस्केप संस्थेच्या केंद्रावर संकलित केला. जमा केलेले प्लास्टिकचे व्यवस्थापन करण्याच्या दृष्टीने प्लास्टिक पुनर्निर्माण प्रक्रियेसाठी कारखान्यांमध्ये पाठविण्यात आले आहे.

- Advertisement -

या अभियानासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील, पाणी व स्वच्छता विभागाच्या उप मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ज्ञानदा फणसे, गट विकास अधिकारी वृषाली यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पाणी व स्वच्छता विभागाचे जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक जयवंत गायकवाड, नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी निशांत रौतेला, सुरेश पाटील, गणेश खातू, सागर मेस्त्री, सुशील साईकर यांनी विशेष प्रयत्न केले.


हेही वाचा – सहकारी साखर कारखाना घोटाळा प्रकरण; आणखीन दोन कारखाने EDच्या रडारवर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -