घरCORONA UPDATEPM Narendra Modi Live: मोदींच्या भाषणातील सर्व मुद्दे; वाचा सविस्तर

PM Narendra Modi Live: मोदींच्या भाषणातील सर्व मुद्दे; वाचा सविस्तर

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज लॉकडाऊनच्या २१ व्या दिवशी पुन्हा एकदा देशाला संबोधित करत आहेत. यावेळी त्यांनी देशवासियांचे आभार मानले.

भाषणातील महत्त्वाचे मुद्दे –

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त देशातील नागरिकांनी जो संकल्प पुर्ण केला, त्याबद्दलही जनतेचे आभार. मी आंबेडकरांना जयंतीनिमित्त नमन करतो.

- Advertisement -

लोक संयमाने लॉकडाऊनचे पालन करत आहेत. साध्या पद्धतीने आपले सण साजरे करत आहेत. ही प्रेरणादायी घटना आहे.

आज विश्वभरात कोरोनाच्या महामारीबद्दल आपण सर्व परिचित आहोत. अन्य देशाच्या तुलनेत आपण संसर्ग रोखण्यात प्रयत्न केलेला आहे.

- Advertisement -

देशात एकही रुग्ण नसताना आपण परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची स्क्रिनिंग सुरु केली होती. जेव्हा रुग्ण आढळले तेव्हा आपण सार्वजनिक गर्दीची ठिकाणे बंद करुन टाकली.

जेव्हा कोरोनाचे ५०० रुग्ण देखील नव्हते, तेव्हा आपण २१ दिवसांचा लॉकडाऊन घोषित केला. आपण जलदगतीने निर्णय घेत कोरोनाला रोखण्याचा प्रयत्न केला.

हे संकट इतकं मोठं आहे की, याची तुलना इतर देशांसी करता येणार नाही. मात्र एक तथ्य आहे, ज्याकडे आपल्याला लक्ष द्यावेच लागेल. ते म्हणजे इतर विकसित देशांमध्ये जी अवस्था आहे, त्याच्या तुलनेत आपल्याकडे चांगली स्थिती आहे.

एक महिन्यापूर्वी जे देश आपल्या सोबत होते, त्या देशांमध्ये आज कोरोना विषाणूची संख्या ३० ते ४० पटींनी अधिक वाढलेला आहे.

भारताने जलदगतीने निर्णय घेतले नसते, तर आज भारताची स्थिती काय झाली असती? याची कल्पना केली तर अंगावर काटा उभा राहतो.

आर्थिकदृष्टीने पाहिले तर लॉकडाऊन आपल्याला महाग पडले आहे. मात्र जनतेच्या जीवाचा विचार केला तर हे आर्थिक संकट काहीच नाही.

देशातले प्रत्येक राज्य, स्थानिक स्वराज संस्थांनी कोरोनाला अटकाव करण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले आहेत.

भारतात कोरोनाविरोधात पुढची लढाई कशी अशील? लोकांच्या अडचणी कशा कमी केल्या जाव्यात? यावर आम्ही राज्यांसोबत निरंतर चर्चा केली.

या चर्चेदरम्यान सर्वांनीच लॉकडाऊन वाढविण्याची मागणी केली. काही राज्यांनी तर लॉकडाऊन वाढविला देखील.

भारतात ३ मे पर्यंत लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय घेत आहोत.

आतापर्यंत जसे पालन केले तसेच यापुढे करा

यापुढील तीन आठवडे लॉकडाऊन आणखी कठोर केला जाईल.

२० एप्रिल पर्यंत प्रत्येक राज्य, जिल्ह्यावर बारकाईने लक्ष दिले जाईल. त्यांनी कोरोना रोखण्यासाठी काय केले? याची विचारणा केली जाईल.

कोरोना हॉटस्पॉट कमी करण्यासंबंधी आता आपले विशेष लक्ष दिले जाणार आहे. ज्या ठिकाणी हॉटस्पॉट आहेत. त्याठिकाणी कडक व्हावे लागणार आहे.

ज्या ठिकाणी लॉकडाऊनचे नियम शिथिल केले जातील, तिथे योग्य ती काळजी घेतली नाही तर पुन्हा प्रतिबंध लावले जाणार आहेत.

१५ एप्रिल रोजी सर्व राज्य सरकार यावर विस्तृत मार्गदर्शन करतील.

देशात सर्वांना अन्नधान्य मिळेल, औषध मिळेल एवढा पुरवठा आपल्याकडे आहे.

तरुणांनी कोरोनाच्या विरोधातील लढ्यात पुढे येऊन मदत केली पाहीजे.

आजच्या लाईव्हच्या माध्यमातून मी देशातील लोकांचा सहभाग मागत आहे.

जनतेने आपल्या घरातील वृद्ध सदस्यांची विशेष काळजी घ्यावी.

आयुष मंत्रालयाने दिलेल्या सूचनांचे पालन केले तर फायदा होईल.

आरोग्य सेवा सेतू APP जरूर डाऊनलोड करा. इतरांनाही त्याबाबत सांगा.

जेवढे होईल तेवढे गरिब परिवारांची देखभाल करा. त्यांना अन्न द्या.

आपल्या व्यवसायात सहकाऱ्यांप्रती संवेदना ठेवा. कुणालाही नोकरीवरून काढू नका.

कोरोनाच्या विरोधात लढणाऱ्या पोलीस, आरोग्य कर्मचारी आणि अत्यावश्यक सेवांमधील कर्मचारांच्या आदर करा.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -