घरताज्या घडामोडीपतीच्या मृत्यूनंतर दुसर्‍या पत्नीचेही विषप्राशन

पतीच्या मृत्यूनंतर दुसर्‍या पत्नीचेही विषप्राशन

Subscribe

आई-चिमुकल्यांचा गळफास प्रकरण

भिवंडी तालुक्यातील पडघाजवळील उंबरखांड पच्छापूर जंगलात एकाच झाडाला रहस्यमय गळफास घेतलेल्या आईसह तीन छोट्या मुलांचे मृतदेह झाडावर गळफास लागलेल्या अवस्थेत गुरुवारी दुपारी आढळले. त्यानंतर हे मृतदेह पुढील तपासणीसाठी जे.जे रूग्णालयात नेले आहेत. या तीनही मुलांच्या वडिलांनी श्रीपत बांगरे याने या घटनेनंतर विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. ही घटना समजल्यावर श्रीपतची दुसरी पत्नी सविता हिनेही विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. या दोघांनाही मुंबईच्या जे. जे. रुग्णालयात दाखल केले आहे.

श्रीपत याने १६ सप्टेंबर रोजी दुसरे लग्न केले होते. त्यानंतर श्रीपतची पहिली पत्नी रंजना हिच्याशी यावरून नेहमी भांडण होत होते. दोन महिन्यांपूर्वी शेतावर जात आहे असं सांगून रंजना आपल्या मुलाबाळांसह घरातून निघून गेली आणि परत आली नाही, अशी तक्रार तिच्या पती श्रीपतने पोलीस ठाण्यात दाखल केली होती.

- Advertisement -

त्यानंतर रंजना व तिच्या तीन मुलांचा शोध सुरु असताना १० डिसेंबर रोजी दुपारी चौघांचे मृतदेह पिच्छापूर येथील जंगलात एका झाडावर गळफास स्थितीत आढळून आले होते. या घटनेनंतर श्रीपत आणि त्याच्या दुसर्‍या पत्नीनेही विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. दोघांना उपचारासाठी मुंबईतील जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पडघा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी.एम.कटके यांनी दिली.

रंजना आणि तिच्या तिन्ही मुलाच्या मृत्यू प्रकरणी रंजनाचा भाऊ अनंत भगत यांच्या तक्रारीवरून श्रीपत व त्याची दुसरी पत्नी सविता यांच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त करणे, हुंड्यासाठी छळ करणे या कलमांतर्गत पडघा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी.एम.कटके यांनी दिली.

- Advertisement -

दुसर्‍या घरोब्याने केला घात
गवंडी काम करणारा उंबरखांडचा श्रीपत बांगरे याने नव्याने घरोबा करत शहापूर तालुक्यातील पाथरवाडीमधील सविता गांगड हिच्याशी संसार थाटला होता. शहापूर गंगा देवस्थान मंदिरात श्रीपत आणि सविताचा घाईघाईत विवाह उरकला होता. २० ऑक्टोबर २०२० रोजी सकाळी ११ वाजता शेतावर गेलेल्या व त्यानंतर घरी न परतलेल्या श्रीपत बांगरे याने पत्नी रंजना, मुलगी दर्शना, रोहिणा आणि मुलगा रोहित हरवल्याची तक्रार पडघा पोलीस ठाण्यात नोंद केली.

तब्बल २ महिन्यांपासून हरवलेल्या चौघांचे मृतदेह गुरुवारी जंगलात आढळून आले. नायलॉनच्या दोरीने हा गळफास लावल्याचे दिसत असून त्यांच्या शरीराचे अवशेष झाडाखाली कुजलेल्या स्थितीत पोलिसांना आढळले. या प्रकरणाचा पडघा पोलीस निरीक्षक कटके तपास करीत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -